निकृष्ट रस्त्याविरोधात उपोषण सुरू
By admin | Published: July 13, 2017 03:38 AM2017-07-13T03:38:07+5:302017-07-13T03:38:07+5:30
स्वाभिमान संघटनेने विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून कुडूस नाक्यावर बेमुदत उपोषण सुरू केले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : स्वाभिमान संघटनेने विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून कुडूस नाक्यावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यावेळी आंदोलक आक्रमक होऊन त्यांनी घोषणाबाजी केली. त्याचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील करीत आहेत.
भिवंडी-वाडा-मनोर रस्ता सुस्थितीत करावा, कुडूस-चिंचघर-देवघर रस्त्याची दुरूस्ती करावी, कुडूस नाक्यावरील गटारे व डिव्हायडरची कामे पूर्ण करा तसेच कोंढले खैरे हा रस्ता नुतनीकरण मे महिन्यात झाले तरी तो पहिल्याच पावसात उखडला गेला. यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू झाले आहे. या आंदोलनाला श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, प्रवक्ते प्रमोद पवार, काँग्रेसचे नेते इरफान सुसे, रामदास जाधव, डॉ. गिरीश चौधरी, देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष तानाजी मोरे, नारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधीर पाटील आदींनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
वाडा तालुका अध्यक्ष रविंद्र मेणे, शुभम जाधव, महेंद्र जाधव, संदीप दुबेले हे उपोषणाला बसले आहेत.