'एमपी'च्या केळीवर वऱ्हाडातील भाविकांचा उपवास

By admin | Published: August 21, 2016 07:02 PM2016-08-21T19:02:03+5:302016-08-21T19:02:03+5:30

श्रावण मासातील वेगवेगळ्या उपवासात सर्वांनाच केळीची आठवण होते. परंतू, गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातून केळीचे घडच हद्दपार झाल्याने जिल्ह्यात मध्यप्रदेशातून केळीची आवक होत आहे.

Fasting of devotees in Varaha on MP's banana | 'एमपी'च्या केळीवर वऱ्हाडातील भाविकांचा उपवास

'एमपी'च्या केळीवर वऱ्हाडातील भाविकांचा उपवास

Next

ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा, दि. २१ : श्रावण मासातील वेगवेगळ्या उपवासात सर्वांनाच केळीची आठवण होते. परंतू, गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातून केळीचे घडच हद्दपार झाल्याने जिल्ह्यात मध्यप्रदेशातून केळीची आवक होत आहे. जिल्ह्यात केळीचे उत्पादन घटल्याने पश्चिम वऱ्हाडातील भाविकांच्या उपवासासाठी एमपीची केळी येत आहे. 

राज्यातील पीक पेरणीच्या क्षेत्रापैकी सरासरी ४४ हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. त्यापैकी केळी लागवडीचे ५० टक्के क्षेत्र हे जळगाव जिल्ह्यातील आहे. त्यामुळे जळगांव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील बसमत तालुका केळी उत्पादनात अग्रेसर आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका व चिखली तालुक्यातील मेरा चौकीची केळी देखिल प्रसिद्ध आहेत.

मात्र उर्वरीत विदर्भातील शेतकऱ्यांनी सुद्धा आधुनिक शेतीची कास धरत केळी लागवड करण्यास सुरूवात केली होती. जळगाव जिल्ह्यापाठोपाठ विदर्भातील शेतीतही केळीचे फड गत काही वर्षांपासून दिसत होते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवण्याकडे कल वाढला असतांना, त्यात वाढत्या मागणीमुळे केळीचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे केळीचे उत्पादन घटले आहे.

हवामानाचा परिणाम केळीच्या वाढीवर व फळे पक्व होण्यास होत  असतो. तसेच केळी पिकाला इतर फळपिकांच्या तुलनेत जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पर्जन्यमानाचा व खोलवर जात असलेल्या पाणी पातळीचा केळी बागांवर परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात केळीची फड दिसेनासे झाले आहेत. श्रावण मासात येणाऱ्या वेगवेगळ्या उपवासात केळीची मागणी वाढली आहे. परंतू, जिल्ह्यात केळीचे उत्पादन होत नसल्याने मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूर तसेच जळगाव खांदेश येथून केळीची पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला, वाशिम या तीन्ही जिल्ह्यात आवक होत आहे. त्यामुळे वऱ्हाडातील भाविकांना आपल्या उपासासाठी मध्यप्रदेशची केळी घ्यावी लागत आहेत. 


बॉक्स........

राज्यातील केळीचे उत्पादन दोन वर्षात घसरले

राज्यात केळी लागवड क्षेत्रामध्ये सन २०१४ पर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. राज्यात सन २००४-०५ मध्ये ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये ४ हजार २०० टन उत्पादन घेण्यात आले होते. त्यानंतर सन २००९-१० मध्ये ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होऊन ४ हजार ३०० टन उत्पादन घेण्यात आले होते. सन २०१०-११ मध्ये ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ४ हजार ५०० टन उत्पादन झाले. सन २०१२-१३ मध्ये ८० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ४ हजार ६०० टन उत्पादन झाले. तर सन २०१३-१४ मध्ये ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ५ हजार २०० टन उत्पादन झाले. २०१४ पर्यंत केळी उत्पादन सुमारे ५ हजार २०० टनच्यावर पोहचले; मात्र २०१५-१६ मध्ये अत्यल्प पावसाचा फटका बसून गेल्या दोन वर्षात राज्यातील  ४० टक्के केळी उत्पादनाला फटका बसला आहे. 



बॉक्स.........

केळीचे उत्पादन घटण्याची कारणे

1.केळीचे एक पीक घेण्यास ४५ ते ७० पाण्याच्या पाण्या लागतात.

2.केळी उष्ण व कटीबंदीय फळ असून त्यास उष्ण व दमट हवामान मानवते.

3.काळी कसदार जमीन व पाणी पुरवठ्याची चांगली सोय आवश्यक.

4.तापमान ६० सेंटीग्रेटपेक्षा कमी असल्यास  केळीची पाने पिवळी पडतात.

5.क्षारयुक्त जमीनी केळी लागवडीस उपयुक्त नाहीत.

6.केळीवरील रोगावर नियंत्रण मिळविण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव.

Web Title: Fasting of devotees in Varaha on MP's banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.