मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा न नोंदवल्याने कुटुंबाचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण
By admin | Published: August 25, 2016 03:57 PM2016-08-25T15:57:17+5:302016-08-25T15:57:17+5:30
अल्पवयीन मुलीला पळवुन नेहचा गुन्हा न नोंद केल्यामुळे पंढरपूरमध्ये कुटुंबाने आमरण उपोषण सुरू केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २५ - अल्पवयीन मुलीला पळवुन नेहचा गुन्हा न नोंद केल्यामुळे पंढरपूर शहरचे तत्कालीन पोलीस निरक्षक किशोर नावंदे व ठाणे अंमलदार शेरखाने यांच्या विरोधात पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यासमोर अमरण उपोषण शुक्रवारपासून सुरु केले आहे.
१ आॅगस्ट २०१६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास १६ वर्षी मुलीला लग्नाचे अमिष दाखवून, फुस लावून रवि महासिध्द सावंत याने मोटार सायकलवर पळवून नेहले आहे. तसेच १९ वर्षीय महिलेला सिध्दार्थ दत्तात्रय बनसोडे (रा. नारायण चिंचोली, ता. पंढरपूर) याने बळजबरीने पळवून नेले आहे. ही घटना दोन्ही तरुणांच्या आई-वडीलांना माहित असतानाही नातलगांच्या फोनवरुन ते स्वत: त्यांना अभय, आसरा देत असल्याने या तरुणांच्या आई-वडीलांना सहआरोपी यामध्ये करण्यात यावे.
या घटनेची माहिती आम्ही पंढरपूर शहर पोलीसांना देत असताना तसेच पळवून घेवून जाणारांची नावे, मोबाईल नंबर देत असतानाही येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी ठाणे अंमलदार शेरखाने यांना तोंडी सांगुन फक्त हरवले असल्याचे तक्रार घेतली आहे. पोलीस निरीक्षक नावंदे व ठाणे अंमलदार शेरखाने यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन घेतला नाही. यामुळे मसा रामा लोखंडे, विजय रामा लोखंडे, अनिता राजेंद्र लोंढे यांनी उपोषण सुरु केले आहे.
या मागण्यासाठी उपोषण
तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर नावंदे व ठाणे अंमलदार शेरखाने यांनी गुन्हा दाखल करुन न घेतल्यामुळे त्यांचेवर निलंबनाची कारवाई करावी. अल्पवयीन मुलीस पळवुन घेवुन जाणा-यावर बलात्कार, प्रोसो आणि लग्नाचे अमिष दाखवुन पळवुन नेलेचा अजामिनपात्र गुन्हा दाखल करावा. अल्पवयीन मुलगी असल्याने कायद्यान्वये आई-वडीलाच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल करावा. विवाहीत स्त्रीस पळवुन घेवुन जाणे व तिला लांब लपवुन अडकवुन ठेवणे याबाबत त्या तरुणावर अधिनियम कलम ४९८ प्रमाणे गुन्हा दाखल करावा. पोलीस निरीक्षक नावंदे यांची झाल्यानंतर आजतागायत तपास अधिकारी यांनी काय तपास केला आहे. याची चौकशी करुन योग्य ती करावाई व्हावी. अल्पवयीन मुलीस व तरुणीस पळवुन घेवुन जाणाºया तरुणांच्या आई-वडीलांना सहआरोपी करावे.