‘वर्षा’बाहेर उपोषणाचा इशारा

By admin | Published: September 7, 2016 05:31 AM2016-09-07T05:31:28+5:302016-09-07T05:31:28+5:30

हाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी, मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Fasting hunger outside of 'rain' | ‘वर्षा’बाहेर उपोषणाचा इशारा

‘वर्षा’बाहेर उपोषणाचा इशारा

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी, मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. २१ सप्टेंबरपासून संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील रामगिरी बंगल्याबाहेर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत, मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नियुक्त केली. मात्र, या समितीची एकही बैठक अद्याप झालेली नाही. विनंती करून निवेदन देऊन संघटनेने वारंवार बैठकीची आठवण करून दिली. मात्र, कोणतीही दाद मिळत
नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परिणामी, बेमुदत उपोषणातून कर्मचारी रोष व्यक्त करणार असल्याचे पठाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Fasting hunger outside of 'rain'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.