पित्याच्या मृत्यूचे दु:ख सारून मुलाने दिली परीक्षा!
By admin | Published: March 3, 2016 02:24 AM2016-03-03T02:24:50+5:302016-03-03T02:24:50+5:30
पेपर सुरू होण्यापूर्वी पितृछत्र हरविले.
जउळका रेल्वे (जि. वाशिम) : दहावीची परीक्षा सुरू होण्याच्या १४ तासांपूर्वी पितृछत्र हरविले अन् दुखाचा डोंगर कोसळला, तरीही डोळय़ातील अङ्म्रूंना तसेच साठवून ठेवत त्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता परीक्षा केंद्र गाठले. एकीकडे तीन तास तो मराठीचा पेपर सोडवितच होता, तर दुसरीकडे त्याच्या पित्याला चिताग्नी दिल्या जात होती. पित्याचे स्वप्न शिक्षणाच्या माध्यमातून सत्यात उतरवू पाहणार्या उडी ता. मालेगाव जि.वाशिम येथील रहिवासी व जउळका रेल्वे येथील शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी शैलेश विनोद घुगे याने दु:खाला धैर्याने तोंड कसे द्यावे, याचा परिचय आपल्या कृतीतून करून दिला. १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. उडी येथील विनोद भिकाराव घुगे यांचा अनिकेत नावाचा एक मुलगा १२ वीची परीक्षा देत होता तर लहान मुलगा शैलेश दहावीची परीक्षा देणार होता. वर्षभर परीक्षेसाठी घेतलेले परिङ्म्रम व यशस्वी होण्याची स्वप्ने उराशी घेऊन शैलेश २९ फेब्रुवारीला परीक्षेत चांगले गुण मिळविण्याच्या इच्छेने उत्साहीत होता; परंतु त्याच रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याच्या पितृछत्रावर काळाने घाला घातला. हृदयविकाराच्या झक्क्याने विनोद घुगे यांचे निधन झाले. उद्या परीक्षा अन् अशातच वडिलांचा मृत्यू झाल्याने शैलेषसमोर काय करावे, हा प्रश्न उभा ठाकला. एककीडे पितृछत्र हरविल्याचे दु:ख तर दुसरीकडे आयुष्यात यशस्वी होण्याची पहिली पायरी.. अखेर आपले दु:ख बाजूला सारुन शैलेशने वडिलांची शिक्षण घेऊन मोठं होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कुटुंबातील सर्वांनी याला संमती दिली. सकाळी ११ वाजता परीक्षेची वेळ व नेमकी तीच वेळ त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी निवडल्या गेल्याने अंत्यविधीला हजर न राहता त्याने परीक्षा केंद्र गाठले व पेपर सोडविला.