दौंड येथून वडिलांनी केले मुलाचे अपहरण

By admin | Published: December 22, 2016 02:46 AM2016-12-22T02:46:23+5:302016-12-22T02:46:23+5:30

दौंड येथून साडेतीन वर्षांच्या कार्तिक या बालकाचे त्याचे वडील आणि आजी यांनी अपहरण केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक

Father kidnapped father from Dand | दौंड येथून वडिलांनी केले मुलाचे अपहरण

दौंड येथून वडिलांनी केले मुलाचे अपहरण

Next

दौंड : दौंड येथून साडेतीन वर्षांच्या कार्तिक या बालकाचे त्याचे वडील आणि आजी यांनी अपहरण केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी दिली.
याप्रकरणी बालकाची आई प्रज्ञा सुजित वनशिव (वय २३, रा. बंगलासाईड, दौंड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुजित वनशिव, लक्ष्मी गायकवाड (दोघेही रा. वनशिववस्ती, धनकवडी, पुणे) यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रज्ञा वनशिव आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे दोघे तीन महिन्यांपासून दौंड येथे आईकडे राहतात. दरम्यान, सुजित याच्याबरोबर सहा वर्षांपूर्वी प्रज्ञाचा विवाह झाला. रविवारी (दि. १८) माझे पती सुजित आणि आजी सासू लक्ष्मी गायकवाड हे दोघे दौंड येथे आले आणि मला म्हणाले, ‘तुझी सासू आजारी आहे. ती कार्तिकची सारखी आठवण काढते, तेव्हा दोन दिवसांसाठी आम्ही कार्तिकला पुण्याला घेऊन जातो,’ असे सांगितल्यानंतर कार्तिकला दोघे घेऊन गेले. त्यानंतर मी कार्तिकला आणण्यासाठी पुणे येथे गेले असता, ‘आम्ही मुलाला आणलेले नाहीच,’ असे सांगून मला तेथून त्यांनी परत दौंडला पाठवले, असे प्रज्ञा वनशिव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Father kidnapped father from Dand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.