एफटीआयआयच्या प्रभारी संचालकपदी पाठराबे
By Admin | Published: July 18, 2015 02:44 AM2015-07-18T02:44:22+5:302015-07-18T02:44:22+5:30
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) प्रभारी संचालकपदी प्रशांत पाठराबे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते संचालक डी.जे. नारायण
पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) प्रभारी संचालकपदी प्रशांत पाठराबे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते संचालक डी.जे. नारायण यांच्याकडून त्यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे स्वीकारली.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने डी.जे. नारायण यांना पुन्हा मुदतवाढ न देता पाठराबे यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपविला. पाठराबे यांनी यापूर्वी डिफेन्सचे जनसंपर्क अधिकारी, एनएफएआयचे प्रभारी संचालकपद अशा जवाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, सध्या ते पीआयबीचे ब्युरो चिफ म्हणून कार्यरत आहेत. आंदोलन किंवा विद्यार्थ्यांवरील कारवाईसंदर्भात विचारले असता, विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची बाजू सर्वप्रथम समजावून घेईन, असे पाठराबे यांनी सांगितले.
डॉ. गणेशदेवी यांचाही विद्यार्थ्यांना पाठिंबा
ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेशदेवी यांनी एफटीआयआयला भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. एनएससीआरटी किंवा ललित कला केंद्र अशा संस्थांमध्येही हेच प्रकार घडत आहेत. क्षमता नसलेल्या लोकांना संस्थांच्या संचालक किंवा अध्यक्षपदी विराजमान केले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे. गुणवत्तेवर आधारित शिक्षणाचा विचार न करता त्याकडे धंदेवाईकतेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.