मॉन्सून वाटचालीसाठी अनुकूल स्थिती

By Admin | Published: May 23, 2017 05:32 AM2017-05-23T05:32:32+5:302017-05-23T05:32:32+5:30

आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर चक्रवात असल्याने नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल नैर्ऋत्य, आग्येन व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही

Favorable position for walking monsoon | मॉन्सून वाटचालीसाठी अनुकूल स्थिती

मॉन्सून वाटचालीसाठी अनुकूल स्थिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर चक्रवात असल्याने नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल नैर्ऋत्य, आग्येन व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४६.६ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस अहमनगर येथे नोंदविले गेले.
विदर्भात तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून येत्या २४ मेपर्यंत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. येत्या २५ मे रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून २६ मे रोजी दक्षिण कोकण- गोवा, दक्षिण मध्य- महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात येत्या २६ मेपर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर, २७ मे रोजी दुपारनंतर गडगडाटी ढग तयार होण्याची शक्यता असून २८ मे रोजी काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.


राज्याच्या प्रमुख शहरांमधील
कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे : ३८.८, लोहगाव : ३९.२, अहमदनगर : ४०.७ , जळगाव : ४१.२, कोल्हापूर : ३७.८, महाबळेश्वर : ३२.१, नाशिक : ३८.०, सांगली : ३९.५, सातारा : ३८.९, सोलापूर : ४१.९, मुंबई : ३३.७, अलिबाग : ३२.९ , रत्नागिरी : ३४.५, पणजी : ३४.८, औरंगाबाद : ४0.४, परभणी : ४२.८, डहाणू : ३४.३, अकोला : ४३.३, अमरावती : ४१.२, बुलडाणा : ४०.२, ब्रह्मपुरी : ४५.३, चंद्रपूर : ४६.६, गोंदिया : ४३.८, नागपूर : ४४.९, वाशिम : ४१.८, वर्धा : ४४.२, यवतमाळ : ४२.५.

Web Title: Favorable position for walking monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.