मॉन्सूनच्या वाटचालीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण;विदर्भात उन्हाचा कडाका कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 08:47 PM2020-05-26T20:47:11+5:302020-05-26T20:58:06+5:30
राज्यात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट
पुणे : अंदमानच्या समुद्रात आगमन केलेल्या मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अम्पन महाचक्रीवादळामुळे अडथळा निर्माण झाला होता. गेला आठवडाभर मॉन्सूनचा मुक्काम अंदमान समुद्र, निकोबार बेटे परिसरात आहे. येत्या २४ तासात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि मध्य बंगालच्या उपसागरात आगमनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अंदमान समुद्रात मॉन्सूनचे १६ मे रोजी आगमन झाले आहे. त्यानंतर त्याची पुढे वाटचाल सुरु झालेली नाही. राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट होती तर, मराठवाड्यात बर्याच ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान नागपूर येथे ४६.८ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे २०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
राज्यात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.२७ ते २८ मे दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २९मे रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचीशक्यता आहे. ३० मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील.
इशारा : विदर्भात पुढील ३ दिवस बर्याच ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा
इशारा हवामान विभागाने दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाचीशक्यता असून रायगड जिल्ह्यात २९ व ३० मे रोजी पावसाची शक्यता आहे. जळगाव,अहमदनगर, सोलापूर, परभणी, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ मे रोजीउष्णतेची लाट असणार आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :
पुणे ३७.६,
लोहगाव ३९.१, जळगाव ४४.७, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर ३१.२, मालेगाव ४़६, नाशिक ३७.५, सांगली ३८़४, सातारा ३८.८, सोलापूर ४४.६, मुंबई ३४.८,सांताक्रुझ ३४.१, अलिबाग ३६.२, रत्नागिरी ३४.८, पणजी ३५.४, डहाणु ३४.७, अकोला ४६.५, अमरावती ४५.६, बुलढाणा ४३, ब्रम्हपूरी ४३.९, चंद्रपूर ४५.२,गोंदिया ४५, नागपूर ४६.८, वाशिम ४३.८, वर्धा ४६.