आयशर ट्रॅक्टर्सच्या रोटोटिलरवर पसंतीची मोहोर
By admin | Published: June 8, 2016 03:59 AM2016-06-08T03:59:27+5:302016-06-08T03:59:27+5:30
शेतकऱ्यांच्या गरजांचा वेध घेत त्यानुसार ट्रॅक्टर्सच्या अनुषंगिक भागांची निर्मिती करणाऱ्या आयशर कंपनीच्या रोटोटिलरवर शेतकऱ्यांनी पसंतीची मोहोर उमटविली आहे.
Next
मुंबई : शेतकऱ्यांच्या गरजांचा वेध घेत त्यानुसार ट्रॅक्टर्सच्या अनुषंगिक भागांची निर्मिती करणाऱ्या आयशर कंपनीच्या रोटोटिलरवर शेतकऱ्यांनी पसंतीची मोहोर उमटविली आहे. आयशर ट्रॅक्टर्ससोबत हा एग्रीस्टार रोटोटिलरच्या वापरामुळे जमिनीची मशागत करताना वेळेमध्ये व डिझेलच्या वापरातही मोठी बचत होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. या रोटोटिलरला असलेले कुशल ब्लेड्स, मल्टी स्पीड हेवी ड्युटी गीयरबॉक्स, दमदार शाफ्ट यामुळे डिझेलची मोठ्या प्रमाणावर बचत होण्यास मदत होत आहे. तसेच, कोणत्याही प्रकारच्या मातीत काम करण्याच्या क्षमतेमुळे हा रोटोटिलर सध्या शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहे. (प्रतिनिधी)