सणासुदीसाठी एफडीए सज्ज
By admin | Published: October 9, 2016 02:06 AM2016-10-09T02:06:20+5:302016-10-09T02:06:20+5:30
सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, तेल, तुपाची मागणी वाढते. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केलेल्या भेसळीचा परिणाम
मुंबई : सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, तेल, तुपाची मागणी वाढते. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केलेल्या भेसळीचा परिणाम आरोग्यावर झाल्यास सणासुदीला गालबोट लागू शकते. हे टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) दसरा आणि दिवाळीसाठी सज्ज झाले आहे.
दसऱ्याला श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम अशा गोड पदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे अनेकदा या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. खव्यामध्येही भेसळ
केली जाते. या प्रकारांना
आळा घालण्यासाठी कोकण विभागातील एफडीएच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. मिठाईची दुकाने आणि अन्य दुकानांची तपासणी करण्यास सांगितली आहे. या दुकानांतील पदार्थांचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार असल्याची माहिती ठाण्याचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देखमुख यांनी दिली.
आॅक्टोबर महिनाअखेर दिवाळी आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात पदार्थांची खरेदी वाढणार आहे.
यात तेल आणि तुपाचाही मोठ्या प्रमाणात समावेश असणार
आहे. त्याचबरोबरीने मिठार्इंचा समावेशही असणार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ सामान्य ग्राहक ओळखू शकत नाही. कारण, त्यात वेगळे असे काही दिसत नाही. या कारणांमुळे या सणासुदीच्या काळात ग्राहकांनीही सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन एफडीएने केले आहे. मिठाई खरेदी करताना दुकानाची विश्वासार्हता तपासून पाहा, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)