देवस्थानातील प्रसादावर ‘एफडीए’ची नजर; सुरक्षित अन्न पुरवठ्याबाबत प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:20 AM2017-09-09T04:20:05+5:302017-09-09T04:20:44+5:30
देवस्थानामधून दिल्या जाणाºया महाप्रसादावर आता अन्न, औषध प्रशासनाचे लक्ष राहणार आहे़ अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणेच भाविकांना प्रसाद मिळण्यासाठी मंदिरात १४ ते १६ सप्टेंबर अन्न, औषध प्रशासनातर्फे विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे़
अहमदनगर : देवस्थानामधून दिल्या जाणाºया महाप्रसादावर आता अन्न, औषध प्रशासनाचे लक्ष राहणार आहे़ अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणेच भाविकांना प्रसाद मिळण्यासाठी मंदिरात १४ ते १६ सप्टेंबर अन्न, औषध प्रशासनातर्फे विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे़
जिल्ह्यात शिर्डी येथे जगप्रसिद्ध देवस्थान आहे़ तसेच शनिशिंगणापूर, मढी, मोहटा, सिद्धटेक, देवगड, कोरठण खंडोबा, मांदळी आदी देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांसाठी सतत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भाविकांना स्वच्छ, निर्भेळ व दर्जेदार महाप्रसाद मिळणे अपेक्षित आहे़ त्यासाठी अन्न बनविताना घ्यावयाची काळजी, बनविलेले अन्न कधीपर्यंत सेवन करता येते, स्वच्छता कशी राखावी आदीबाबत राज्यातील देवस्थानांमध्ये कार्यशाळा घेऊन प्रबोधन करण्याचे आदेश अन्न, औषध प्रशासन आयुक्तांनी दिले आहेत़ अन्न तज्ज्ञ उमेश कांबळे हे देवस्थानचे अध्यक्ष, ट्रस्टी व कर्मचाºयांना मार्गदर्शन करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त बालू ठाकूर यांनी सांगितले़
मंदिराबाहेरील विक्रेत्यांचेही प्रबोधन : मंदिराबाहेर अन्नपदार्थ विक्री करणाºया विक्रेत्यांना अन्न परवाना सक्तीचा आहे़ तसेच त्यांचेही प्रबोधन केले जाणार आहे़