प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्याने स्नॅपडीलवर एफडीएचा छापा
By admin | Published: April 17, 2015 07:18 PM2015-04-17T19:18:04+5:302015-04-17T19:22:38+5:30
प्रिस्क्रीप्शन आवश्यक असलेली औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्याने एफडीएने स्नॅपडीलच्या गोडाऊनवर छापा टाकला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेली स्नॅपडील ही वेबसाईट अडचणीत आली आहे. प्रिस्क्रीप्शन आवश्यक असलेली औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्याने एफडीएने स्नॅपडीलच्या गोडाऊनवर छापा टाकला आहे. एफडीएने मोठ्या प्रमाणात औषधे जप्त केली असून यासंबंधी कंपनीला नोटीसही पाठवण्यात आली आहे.
अनेक ऑनलाइन शॉपिंग कंपन्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करत असतात. मात्र काही औषधांसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन आवश्यक असते. स्नॅपडीलवरून मात्र कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे औषध विक्री करणे बेकायदेशीर असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने एफडीएने ही कारवाई केली आहे.