कमी सौर वादळांमुळे मान्सून कमकुवत होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 06:02 AM2018-06-24T06:02:45+5:302018-06-24T06:02:53+5:30

सूर्यावरील सौर वादळे आणि मान्सून याचा निकटचा संबंध असून यंदाचे वर्ष हे किमान सौर डागांच्या वादळांचे वर्ष आहे.

Fear of low monsoon due to low solar storms | कमी सौर वादळांमुळे मान्सून कमकुवत होण्याची भीती

कमी सौर वादळांमुळे मान्सून कमकुवत होण्याची भीती

Next

विवेक भुसे
पुणे : सूर्यावरील सौर वादळे आणि मान्सून याचा निकटचा संबंध असून यंदाचे वर्ष हे किमान सौर डागांच्या वादळांचे वर्ष आहे़ त्यामुळे यंदा सुरुवातीला मान्सून कमजोर होण्याची दाट शक्यता असून परिणामी सुरुवातीला पाऊस कमी राहील, असा दावा अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे़
जोहरे हे पाषाण येथील भारतीय उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत १२ वर्षे मान्सूनवर अभ्यास करीत होते़ तसेच सौर डाग आणि मान्सूनचा संबंध यावर गेली १७ वर्षे अभ्यास करीत आहेत़ जोहरे यांनी सांगितले, सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरुपातच नव्हे तर विद्युत चुंबकीय क्षेत्रात देखील बदल घडवून आणते़ पृथ्वीचे चुंबकीय आवरण वातावरण संतुलनाचे कार्य करते़ जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त, असे ढोबळमानाने म्हणता येईल. (२०१८) हे २४ क्रमांकाच्या आवर्तनाचे व किमान सौर डागांच्या वादळांचे वर्ष आहे. बेल्जियमच्या सोलर इन्फ्लुअन्सेस डाटा अ‍ॅनालिसीस सेंटर, (एसआयडीएस) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्यात. यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे निघाल्याची माहिती मिळते. याचा थेट परिणाम मान्सूनवर होतो, असे आढळले आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून कमजोर होण्याची शक्यता आहे़


पंतप्रधान कार्यालय, आयएमडीला आधीच दिला होता इशारा
जोहरे यांनी निष्कर्षाची कल्पना पंतप्रधान कार्यालय व भारतीय हवामान विभागाला ४ एप्रिल रोजी दिली होती़ पंतप्रधान कार्यालयाने ते हवामान विभागाकडे पाठवून त्यांचे मत मागविले होते़ त्यानुसार दिल्लीतील हवामान विभाग कार्यालयातील शास्त्रज्ञ कुलदीप श्रीवास्तव यांनी हवामान विभागाचा अंदाज बरोबर असल्याचे मत व्यक्त केल्याने कार्यालयाने १३ जून रोजी जोहरे यांची फाईल बंद केली़

Web Title: Fear of low monsoon due to low solar storms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.