वित्तमंत्र्यांच्या बंगल्यावर शिक्षकांची धडक, अनुदानाची मागणी : पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 03:39 AM2017-11-17T03:39:45+5:302017-11-17T03:40:03+5:30

राज्य शासनाने अनुदानासाठी पात्र ठरवल्यानंतर घोषित केलेल्या ६९१ शाळा व तुकड्यांच्या अनुदानासाठी शिक्षकांनी गुरुवारी थेट वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शासकीय बंगल्यावर धडक दिली.

 Fear of teachers in the finance minister's bungalow; Demand for grant: Police action | वित्तमंत्र्यांच्या बंगल्यावर शिक्षकांची धडक, अनुदानाची मागणी : पोलिसांनी केली कारवाई

वित्तमंत्र्यांच्या बंगल्यावर शिक्षकांची धडक, अनुदानाची मागणी : पोलिसांनी केली कारवाई

Next

मुंबई : राज्य शासनाने अनुदानासाठी पात्र ठरवल्यानंतर घोषित केलेल्या ६९१ शाळा व तुकड्यांच्या अनुदानासाठी शिक्षकांनी गुरुवारी थेट वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शासकीय बंगल्यावर धडक दिली. वित्तमंत्री भेटत नसल्याने शिक्षकांनी राष्ट्रगीत म्हणत सरकारचा निषेध केला. या वेळी मलबार हिल पोलिसांनी काही शिक्षकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.
अनुदानाच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्याने गुरुवारी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट वित्तमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक दिली. यातील काहींना पोलिसांनी दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याने शिक्षकांच्या महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवस शांततेच्या मार्गाने आझाद मैदानात धरणे दिल्यानंतरही वित्तमंत्री भेटत नसल्याने शिक्षकांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागल्याचे कृती समितीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
आंदोलन सुरूच ठेवणार
वित्तमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांमध्ये शिक्षकांचा फुटबॉल केला जात आहे. संबंधित विभागातून शुक्रवारी भेट मिळाली नाही, तर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल. मान्य झालेल्या मागण्यांची फाईल शिक्षण विभागातून वित्त विभागाकडे आणि वित्त विभागाकडून शिक्षण विभागाकडे पाठवली जात आहे. त्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन शुक्रवारी सुरूच ठेवणार असल्याचे कृती समितीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

Web Title:  Fear of teachers in the finance minister's bungalow; Demand for grant: Police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.