निर्भय व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवा- जे.एस. सहारिया
By admin | Published: November 16, 2016 05:58 PM2016-11-16T17:58:57+5:302016-11-16T17:58:57+5:30
राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया ही संविधानाच्या निर्देशानुसार निर्भय, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने राबवा
ऑनलाइन लोकमत
जळगाव,दि.16- राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया ही संविधानाच्या निर्देशानुसार निर्भय, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने राबवा, असे निर्देश राज्य निवडणुक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज जळगाव येथे आयोजित विभागीय आढावा बैठकीत दिले. राज्य निवडणुक आयुक्त श्री. सहारिया हे आज जळगाव जिल्हादौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागीय बैठकीत त्यांनी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या प्रक्रियेचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलल्या नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस राज्य निवडणुक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, अपर पोलीस महासंचालक एस.पी. यादव, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक नवल बजाज, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवाडे, नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, जळगावच्या जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल,जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जळगाव जिल्ह्यासाठी मुख्य निवडणुक निरीक्षक आस्तिककुमार पाण्डेय, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य निवडणुक निरीक्षक रविंद्र बिनवडे,जळगावचे पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील तसेच सर्व निवडणुक निरीक्षक, निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी व अन्य अधिकारी आदी उपस्थित होते