फरासखान्याच्या आवारात अजूनही बेवारस वाहने

By admin | Published: July 11, 2014 11:39 PM2014-07-11T23:39:26+5:302014-07-11T23:39:26+5:30

फरासखान्याच्या आवारात दुचाकीचा स्फोट झाल्याच्या घटनेला 24 तास उलटले, तरी पोलीस प्रशासन निष्काळजी आणि ढिम्म असल्याचे दिसून आले आहे.

Fearless vehicles still remain in the premises of the Faras Khan | फरासखान्याच्या आवारात अजूनही बेवारस वाहने

फरासखान्याच्या आवारात अजूनही बेवारस वाहने

Next
पुणो : फरासखान्याच्या आवारात दुचाकीचा स्फोट झाल्याच्या घटनेला 24 तास उलटले, तरी पोलीस प्रशासन निष्काळजी आणि ढिम्म असल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी झालेल्या स्फोटाची तपासणी करण्याकरिता पुणो पोलीस, दहशतवादविरोधी पथक, एनएसजीचे कमांडो आले. तसेच गृहमंत्री आर. आर. पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परंतु, स्फोटापासून काही मीटर अंतरावर घातपात करण्याकरिता वापर होण्याची शक्यता असलेली बेवारस वाहने धूळ खात आहेत. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या परिसरात गुरुवारी स्फोट झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले. घातपात करताना बहुतांश वेळा चोरीच्या 
किंवा बेवारस वाहनांचा वापर 
केला जातो. त्याप्रमाणो या स्फोटात चोरीच्या वाहनाचा वापर करण्यात आला. चोरीचे वाहन जरी ताब्यात घेण्यात आले असले, तरी पोलीस ठाण्याच्या परिसरातील धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांबाबत पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या शेजारी मोकळी जागा आहे. आजूबाजूच्या परिसरात ‘नो पार्किग’मध्ये पार्क केलेली वाहने कारवाई करण्याकरिता येथे आणली जातात. तसेच, काही जप्त केलेली वाहने येथे ठेवण्यात आली आहेत. कित्येक दिवसांपासून यातील काही वाहने धूळ खात पडून आहेत. दररोज शेकडो पोलिसांची ये-जा या ठिकाणी सुरू असते. तसेच, सामान्य नागरिकही शेकडोंच्या संख्येने येतात. परंतु, तरीही बेवारस वाहनांबाबत कोणतीही पावले उचलली जात नाहीत. पुण्याला हादरविणारा स्फोट होऊन 24 तास उलटले, तरी धूळ 
खात पडलेल्या वाहनांबाबत प्रशासन ढिम्म आहे.(प्रतिनिधी)
 
संवेदनशील परिसर 
असून दुचाकींचा खच
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर असून, तेथे  24 तास सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शेजारीच फरासखाना पोलीस ठाणो आणि झोन-1चे कार्यालय आहे. अतिमहत्त्वाचे ठिकाण असूनही येथे मोठय़ा प्रमाणात दुचाकी वाहने लावली जातात. कित्येक दिवसांपासून येथील काही वाहने धूळ खात आहे. स्फोटापूर्वीची आणि सध्याची परिस्थिती ‘जैसे थे’ असून, पुणोकरांची सुरक्षा धोक्यात आली आहे. 
 

 

Web Title: Fearless vehicles still remain in the premises of the Faras Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.