2 फेब्रुवारीला राज्यभरात 'कॉलेज बंद' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 01:23 PM2018-01-29T13:23:26+5:302018-01-29T13:25:50+5:30

२ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व 'कनिष्ठ महाविद्यालये बंद' करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर व मुंबईत आझाद मैदान येथे 'जेलभरो ' आंदोलन करण्यात येईल.

On February 2 Junior college teachers State wide Agitation | 2 फेब्रुवारीला राज्यभरात 'कॉलेज बंद' आंदोलन

2 फेब्रुवारीला राज्यभरात 'कॉलेज बंद' आंदोलन

googlenewsNext

मुंबई - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी व पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे राज्यात पाच टप्प्यात आंदोलन करण्यात येत असून चौथ्या टप्प्यात २ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व 'कनिष्ठ महाविद्यालये बंद' करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर व मुंबईत आझाद मैदान येथे 'जेलभरो ' आंदोलन करण्यात येईल.
शासनाने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आदेश न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व नाईलाजाने १२ वी बोर्ड परीक्षेच्या काळात 'बहिष्कार आंदोलन' करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल असा इशारा संघटने तर्फे देण्यात आला आहे. 

१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे, २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन देणे, सर्व शिक्षकांना २४ वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे, कायम विना अनुदानित   कडील शिक्षकांना अनुदान द्यावे, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे,  २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे, सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा. या व अन्य ३२ मागण्यांचे निवेदन शासनास देण्यात आल्याचे म.रा.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष 
प्रा.अनिल देशमुख यांनी सांगितले.

Web Title: On February 2 Junior college teachers State wide Agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.