आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता आज जमा होणार, संख्या आणखी घटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:12 IST2025-02-27T12:29:30+5:302025-02-27T13:12:28+5:30

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज जमा होणार आहे.

February installment will be deposited in the accounts of mukhya mantri ladki bahin yojana today, will the number decrease further? | आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता आज जमा होणार, संख्या आणखी घटणार?

आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता आज जमा होणार, संख्या आणखी घटणार?

Ladki Bahin Yojana ( Marathi News ) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसापासून फेब्रुवारी महिन्यातील हप्ता अजूनही जमा झालेला नाही. याबाबत आता एक मोठी अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला ३४९० कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाकडून दोन दिवसांपूर्वी तांत्रिक कारणामुळं हप्ता वितरीत करण्यात उशीर झाल्याचं सांगण्यात आले होते. 

पुण्यात हायव्हॉल्टेज राडा! योगेश कदमांचा ताफा अडवला; संतप्त महिलांचा आक्रोश

दरम्यान, आता आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण,या  महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या घटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

फेब्रुवारी महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी ३४९० कोटी रुपयांचा निधी अर्थ विभागाकडून देण्यात आला आहे. आज महिला आणि बाल विकास विभागाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. 

मागील महिन्यापासून या योजनेच्या नियमांची कठोर अंबलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठी घट झाली आहे.  डिसेंबर महिन्यात ज्या राज्य शासनाने  २ कोटी ४६ लाख महिलांच्या खात्यात रक्कम पाठवण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता त्या महिन्यात २ कोटी  ४१ लाख महिलांना लाभ देण्यात आला.जानेवारी महिन्यात ५ लाख महिलांची संख्या घटली होती. आणखी पडताळणी करण्यात आली असून आता आणखी ४ लाख लाभार्थ्यांची घट होणार असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: February installment will be deposited in the accounts of mukhya mantri ladki bahin yojana today, will the number decrease further?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.