'चारा छावण्या भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांसाठी कुरण'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:31 AM2019-06-22T04:31:44+5:302019-06-22T06:37:45+5:30

ऑडिट करण्याची अशोक चव्हाण यांची मागणी; कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप

'Feeding of fodder for BJP-Shiv Sena workers' | 'चारा छावण्या भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांसाठी कुरण'

'चारा छावण्या भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांसाठी कुरण'

Next

मुंबई : महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले गेले आहे. सरकारी अनुदान लाटणाऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्यातील चारा छावण्यांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या स्वयंसेवी संस्था दाखवून छावण्या सुरू केल्या व त्यातून करोडो रुपयांचे सरकारी अनुदान लाटले. जनावरांची संख्या जास्त दाखवून मलिदा लाटण्यात आला. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्यांची तपासणी केली असता या छावण्यांमध्ये प्रत्यक्षात कमी प्रमाणात जनावरे दिसून आली, मात्र जास्त जनावरांचे अनुदान लाटण्यात आल्याचे उघड झाल्याचे चव्हाण म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या कारवाईत १६ हजार जनावरे कमी आढळून आली आहेत. जनावरांची वाढीव संख्या दाखवून दिवसाला ७ लाख ते १४ लाख रुपयांचे सरकारी अनुदान लाटल्याचे यातून दिसून आले आहे. अशाच पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या बोगस दाखवून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले आहे. बीड जिल्ह्यासह सर्व चारा छावण्यांचे ऑडिट केले तर हा घोटाळा यापेक्षाही मोठा असल्याचे समोर येईल. त्यामुळे सरकारने याची गांभीर्याने दखल घेत तातडीने चारा छावण्यांचे ऑडिट करून सरकारी अनुदान लाटणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

Web Title: 'Feeding of fodder for BJP-Shiv Sena workers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.