टिकटॉक बंद झाल्यानं आम्ही उद्ध्वस्त झालो; दोन बायकांचा धनी म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 08:55 AM2020-07-02T08:55:06+5:302020-07-02T08:58:24+5:30

मोदी सरकारकडून टिकटॉकवर बंदी; अनेक टिकटॉक स्टार चिंतेत

feel like devastated both wives cried dinesh pawar on tiktok ban | टिकटॉक बंद झाल्यानं आम्ही उद्ध्वस्त झालो; दोन बायकांचा धनी म्हणाला...

टिकटॉक बंद झाल्यानं आम्ही उद्ध्वस्त झालो; दोन बायकांचा धनी म्हणाला...

googlenewsNext

धुळे: टिकटॉकनं अनेकांना प्रसिद्धी दिली. कित्येकांना एखाद्या सेलिब्रिटीसारखं वलय मिळवून दिलं. मात्र केंद्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयानं टिकटॉक स्टार चिंतेत आहेत. टिकटॉक बंद झालं. आता पुढे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. धुळ्यात राहणारे दिनेश पवारदेखील टिकटॉकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. दोन पत्नींसह टिकटॉक व्हिडीओ करणाऱ्या दिनेश पवार यांना सरकारनं घेतलेल्या बंदीच्या निर्णयामुळे धक्का बसला. आम्ही उद्ध्वस्त झालो. टिकटॉकवरील बंदीची बातमी ऐकून माझ्या दोन्ही बायका अक्षरश: ढसाढसा रडल्या, अशा शब्दांमध्ये पवार यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या.

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. १५ जूनला या भागात रक्तरंजित संघर्ष झाल्यानं परिस्थिती आणखी चिघळली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं काही चिनी अ‍ॅप देशासाठी धोकादायक असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिली. त्यानंतर मोदी सरकारनं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. या निर्णयाचा मोठा फटका टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवलेल्यांना बसला आहे.

धुळे जिल्ह्यात राहणारे दिनेश पवार टिकटॉवर अतिशय प्रसिद्ध होते. त्यामुळे सरकारच्या  निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. 'आम्ही उद्ध्वस्त झालो. मात्र आमच्या बाबतीत हा प्रकार घडलेला नाही, याची आम्हाला कल्पना आहे. टिकटॉकवरील बंदीची बातमी पाहून माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या. या निर्णयामुळे आमच्यासारखेच लाखो जण दुखावले गेले आहेत,' असं पवार म्हणाले. आता यूट्यूबकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

दिनेश पवार नव्वदच्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांवर नृत्य करून टिकटॉक व्हिडीओ तयार करायचे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या दोन्ही पत्नीदेखील असायच्या. यामधून त्यांनी ३० लाखांची कमाई केल्याची चर्चा होती. मात्र ही बाब पवार यांनी फेटाळली. आम्हाला त्यातून पैसे मिळायचे नाहीत. मात्र आमची प्रसिद्धीची इच्छा पूर्ण झाली, असं पवार यांनी सांगितलं.

‘याला म्हणतात कर्माचे फळ...’! टिकटॉक बॅन होताच पुन्हा एकदा ट्रेंड होतोय कॅरी मिनाटी!!

अ‍ॅप बंद करण्याच्या निर्णयाबाबत चीनने व्यक्त केली गंभीर चिंता; प्ले स्टोअर्सवरून टिकटॉक गायब

Read in English

Web Title: feel like devastated both wives cried dinesh pawar on tiktok ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.