आंतरजातीय विवाहित जोडप्यांचा सत्कार

By admin | Published: October 19, 2016 03:32 AM2016-10-19T03:32:08+5:302016-10-19T03:32:08+5:30

मागासवर्ग प्रवर्ग विवाहित जोडप्यांचा सत्कार समारंभ माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आला होता.

Felicitations of inter-caste married couples | आंतरजातीय विवाहित जोडप्यांचा सत्कार

आंतरजातीय विवाहित जोडप्यांचा सत्कार

Next


माणगाव : रायगड जिल्हा परिषदेकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या सवर्ण व अनुसूचित जाती जमाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्ग विवाहित जोडप्यांचा सत्कार समारंभ माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
माणगाव येथील कुणबी समाज सभागृहात रायगड जिल्हा परिषदेतर्फेआंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे तसेच समाजातील जातीयता दूर व्हावी यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील ४८ जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजनेतून या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी आ. सुनील तटकरे म्हणाले की, समाजातील सामाजिक अस्वस्थता दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळी आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना समाज किंवा घरातील लोक स्वीकारत नाही त्यावेळी त्यांच्या पाठीशी सरकार असल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. याच सामाजिक बांधिलकीमधून शासनाने ही योजना सुरू केली होती. या योजनेसाठी केंद्र शासनाचा निधी मिळाला परंतु राज्य शासनाचा निधी अद्याप मिळालेला नाही. हा निधी मिळण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू, असे आश्वासन आ. तटकरे यांनी दिले. यावेळी जि.प. अध्यक्ष सुरेश टोकरे, समाजकल्याण सभापती गीता जाधव, माणगांव नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे आदी मान्यवरांसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांना लॅपटॉप
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजनेतून या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप, अपंगांना झेरॉक्स मशीन वाटप करण्यात आले. लॅपटॉपमुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असून अपंगांनाही झेरॉक्स मशीनमुळे स्वत:चा व्यवसाय सुरु करता येणार आहे.

Web Title: Felicitations of inter-caste married couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.