छत्रपती शिवरायांवर संशोधनासाठी मिळणार ‘फेलोशिप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 03:01 AM2018-02-19T03:01:20+5:302018-02-19T03:15:19+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर उत्तर महाराष्टÑ विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्राकडून संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना यंदापासून २४ महिन्यांची फेलोशिप दिली जाणार आहे.
अजय पाटील
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर उत्तर महाराष्टÑ विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्राकडून संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना यंदापासून २४ महिन्यांची फेलोशिप दिली जाणार आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री विजय नवल पाटील यांनी यासाठी विद्यापीठाला २ लाख रुपयांचा धनादेश दिला असून, विद्यापीठातील पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळणार आहे. दरम्यान, किती विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळेल हे अद्याप निश्चित नसून, व्यवस्थापन परिषदेच्या पहिल्या सभेत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याला दर महिन्याला ८ ते १० हजार रुपये दिले जाणार आहेत.