रेल्वे परीक्षेत महिला डमी परीक्षार्थी गजाआड
By admin | Published: December 2, 2014 04:36 AM2014-12-02T04:36:36+5:302014-12-02T04:36:36+5:30
रेल्वे रिक्रुटमेन्ट बोर्डाने आयोजित केलेल्या परीक्षेला डमी बसलेल्या तरुणीला भांडुप पोलिसांनी अटक केली. रेखाकुमारी कपिलदेव यादव (२१) असे डमी बसलेल्या तरुणीचे नाव असून, ती मूळची बिहारची
मुंबई: रेल्वे रिक्रुटमेन्ट बोर्डाने आयोजित केलेल्या परीक्षेला डमी बसलेल्या तरुणीला भांडुप पोलिसांनी अटक केली. रेखाकुमारी कपिलदेव यादव (२१) असे डमी बसलेल्या तरुणीचे नाव असून, ती मूळची बिहारची आहे. ती ज्या महिला उमेदवारासाठी डमी बसली होती तिचा पोलीस शोध घेत आहेत.
भांडुप पश्चिमेकडील एनईएस रत्नम महाविद्यालयात रविवारी ११ ते २ या कालावधीत रेल्वेच्या रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा पार पडली. मूळ परीक्षार्थी पिंकी कुमारी दास (२१) हिने आपल्या जागी रेखाला परीक्षेला बसविले होते. परीक्षा सुरू होताच पर्यवेक्षकांनी उमेदवारांची हॉल तिकिटे तपासण्यास सुरुवात केली. रेखाजवळील हॉल तिकीटही तपासले गेले. तेव्हा रेखा आणि तिच्याजवळील हॉल तिकिटावरील फोटो भिन्न असल्याचे पर्यवेक्षकाला जाणवले. त्याने केलेल्या चौकशीत रेखा आणि पिंकीचे भांडे फुटले. (प्रतिनिधी)