महिलांमध्ये घबराट पसरविणारे कृत्य

By admin | Published: May 10, 2017 01:53 AM2017-05-10T01:53:12+5:302017-05-10T01:53:12+5:30

नयना पुजारी यांचा खून नोकरदार महिलांमध्ये घबराट पसरविणारा असून ही घटना दुर्मिळातील दुर्मीळ आहे, असे विशेष सरकारी

Feminism spreads among women | महिलांमध्ये घबराट पसरविणारे कृत्य

महिलांमध्ये घबराट पसरविणारे कृत्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नयना पुजारी यांचा खून नोकरदार महिलांमध्ये घबराट पसरविणारा असून ही घटना दुर्मिळातील दुर्मीळ आहे, असे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले.
आरोपींनी घटनेच्या दिवशी नयना यांना बसस्टॉपवर उभ्या असताना कारमध्ये घेतले. सुरक्षित स्थळी सोडणे अपेक्षित होते, मात्र त्यांचे अपहरण केले. त्यांना विवस्त्र केले. पाच तास विवस्त्र अवस्थेत कारमधून फिरवले. त्या मदतीसाठी रडत होत्या, त्यांची काय अवस्था झाली असेल? आरोपींनी नयना यांच्यावर तीन वेळा बलात्कार केला. त्या मदतीसाठी याचना करत असताना आरोपी तो प्रकार एन्जॉय करत होते, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
निंबाळकर म्हणाले, आरोपींनी केलेले कृत्य अमानवीय व राक्षसी आहे. केलेले कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी ओढणीने त्यांचा गळा आवळला. चेहऱ्यावर दगड टाकून चेहरा विद्रुप केला. आरोपींनी असाह्य महिलेवर अत्याचार केला. या खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरु असताना राऊत पळून गेला. त्याला पुन्हा पकडल्यानंतर सहा वर्षे शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींना केलेल्या कृत्याचा त्यांना कोणताही पश्चाताप नाही.
सध्या चाळीस टक्क्यांहून अधिक महिला काम करतात. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ५० टक्के आहे. आरोपींनी केलेले कृत्य महिलांच्या सुरक्षेला धक्का पोहचाविणारे आहे. या प्रकरणाचा जितका परिणाम कुटुंबियांवर झाला, तितकाच नोकरदार महिलांवरही झाला आहे, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा व्हावी : योगेश राऊत
‘मी गुन्हा केला नाही. माफीचा साक्षीदार बनलेल्या राजेश चौधरी याने आणि त्याच्या दोन मित्रांनी हा गुन्हा केला आहे. चौधरी माझी गाडी घेऊन गेला होता. माझ्याबरोबर माफीचा साक्षीदार चौधरी यालाही शिक्षा द्यावी. बायको, मुलगी आणि आई असे माझे कुटुंब आहे. याचा विचार करून मला दया दाखवावी. कमीत कमी शिक्षा सुनवावी,’ अशी विनवणी मुख्य आरोपी योगेश राऊत याने न्यायालयास केली.
शिक्षेवर काय बोलायचे आहे का, अशी विचारणा न्यायालयाने तिघांना केली. त्यावेळी आपण हा गुन्हा केला नसल्याचे राऊत याने सांगितले. महेश ठाकूर याने, न्यायालय देईल ती शिक्षा मान्य असल्याचे सांगितले. तर विश्वास कदम म्हणाला, ‘‘न्यायालयात आरोपींना शिक्षा होत असल्याचे ऐकले होते. मात्र, ज्याच्या गुन्हयाशी काहीही संबंध नसतानाही शिक्षा होत असल्याची प्रचिती आज येत आहे. माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी मला या प्रकरणात गोवले आहे.’’

Web Title: Feminism spreads among women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.