बियाणांसाठी कोरड्या विहिरीत उपोषण
By admin | Published: May 23, 2016 04:57 AM2016-05-23T04:57:38+5:302016-05-23T04:57:38+5:30
खरीप पेरणीसाठी अनुदानाच्या स्वरुपात बियाणे, खते द्यावेत, या मागणीसाठी तालुक्यातील पांगरा ढोणे येथे सात शेतकऱ्यांनी २५ फुट कोरड्या विहिरीत २२ मेपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़
पूर्णा (जि. परभणी) : खरीप पेरणीसाठी अनुदानाच्या स्वरुपात बियाणे, खते द्यावेत, या मागणीसाठी तालुक्यातील पांगरा ढोणे येथे सात शेतकऱ्यांनी २५ फुट कोरड्या विहिरीत २२ मेपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़
पूर्णा तालुक्यात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून, ५० गावांत पाणीटंचाई आहे़ यावर्षी पाऊस चांगला बरसेल याची आशा असताना खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही़
शासनाने शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरुपात बियाणे व खते पुरवावीत, अशी मागणी करीत तालुक्यातील पांगरा ढोणे येथील शेतकरी तुकाराम ढोणे, साहेबराव ढोणे, भुजंग ढोणे, बालाजी ढोणे, बाबू ढोणे, गजानन ढोणे, आत्माराम ढोणे या शेतकऱ्यांनी पांगरा शिवारातील २५ फुट कोरड्या विहिरीत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे़ (प्रतिनिधी)