बोगस शौचालयप्रकरणी उपोषण

By admin | Published: August 14, 2016 02:24 PM2016-08-14T14:24:31+5:302016-08-14T14:24:31+5:30

वाशिम तालुक्यातील सोंडा येथे अनेकांनी जुने, तर काहींनी दुसºयाचे शौचालय दाखवून अनुदान हडप केल्याचा आरोप करीत अपंग जनता दलाच्या पदाधिकार्‍यांनी जि.प. समोर बेमुदत उपोषण सुरू केले.

Festivals of bogus toilets | बोगस शौचालयप्रकरणी उपोषण

बोगस शौचालयप्रकरणी उपोषण

Next
>वाशिम : वाशिम तालुक्यातील सोंडा येथे अनेकांनी जुनेच शौचालय दाखवून, तर काहींनी दुसर्‍याचे शौचालय दाखवून अनुदान हडप केल्याचा आरोप करीत अपंग जनता दलाच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर १४ आॅगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी शासनातर्फे शौचालय बांधकामाकरिता १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. सोंडा येथे अनेकांनी शौचालय बांधकाम केले आहे. यापैकी २० ते २५ लाभार्थींनी जुने शौचालय दाखवून तर काहींनी दुसºयाचे शौचालय दाखवून १२ हजार रुपयांचे अनुदान हडप केल्याची तक्रार अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय पंडित यांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने १४ आॅगस्ट रोजी अपंग जनता दलाचे पदाधिकारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. अनुदान हडप प्रकरणाची चौकशी करणे आणि दोषींविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली.

Web Title: Festivals of bogus toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.