फातिमा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ
By Admin | Published: October 18, 2016 02:58 AM2016-10-18T02:58:01+5:302016-10-18T02:58:01+5:30
ख्रिश्चन धर्मीयांचे प्रार्थना मंदिर (चर्च ) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे.
कर्जत : येथील ख्रिश्चन धर्मीयांचे प्रार्थना मंदिर (चर्च ) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी १३ आॅक्टोबरनंतर येणाऱ्या रविवारी या मातेची तीर्थयात्रा असते. यंदा रविवारी १६ आॅक्टोबर रोजी ही ८१ वी तीर्थयात्रा उत्साहात संपन्न झाली. देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी मातेचे दर्शन घेतले.
कर्जत रेल्वे स्थानकानजीक असलेल्या चर्चच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सकाळी रायगड धर्म प्रांतचे फादर झेवियर देवदास आणि फादर सॅम्युवेल रायर यांच्या हस्ते फातिमा मातेची पूजा व प्रार्थना करण्यात आली. चर्चचे प्रमुख फादर कॅलीस्टर फर्नांडिस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. फादर सायमन बोर्जीस यांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथकाच्या तालावर फातिमा मातेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ख्रिश्चन धर्मीयांबरोबरच अन्य धर्मीय भाविकांनीही जागोजागी मातेच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर फादर बार्थोल मच्याडो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी उपनगराध्यक्ष लालधारी पाल, मिलिंद चिखलकर, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे आदींनी माऊलीची प्रार्थना केली. गुड शेफर्ड, डॉन बास्को आदी या शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले.
दुपारी फादर टोनी प्रेम व फादर अँन्थोनी डिसोझा यांनी आरोग्य दान प्रार्थना केली. मुख्य मिसा फादर इलियास डिकुना यांनी व्याख्यानातून मार्गदर्शन केले. सायंकाळी योहाना क्षीरसागर, कार्लस कसबे यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सनी डिमेलो, सिल्विस्टर फ्रान्सिस, विल्सन पानपाटील, विक्टर मास्करेन्स, लेन्सची कोलेसो,जेम्स जेकब, इग्नेसेस टपले, नेल्सन फ्रान्सिस आदींसह असंख्य ख्रिश्चन बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)
>मिरवणुकीत मातेच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव
फादर सायमन बोर्जीस यांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथकाच्या तालावर फातिमा मातेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ख्रिश्चन भाविकांनीही जागोजागी मातेच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव केला.रविवारी सायंकाळी योहाना क्षीरसागर, कार्लस कसबे यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सनी डिमेलो, सिल्विस्टर फ्रान्सिस आदी उपस्थित होते.