पुणतांब्यात २१ पासून पुन्हा उपोषण

By admin | Published: July 11, 2017 04:47 AM2017-07-11T04:47:24+5:302017-07-11T04:47:24+5:30

राज्य सरकारने ३४ हजार कोटी रूपयांची जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे

Festivity again since 21st | पुणतांब्यात २१ पासून पुन्हा उपोषण

पुणतांब्यात २१ पासून पुन्हा उपोषण

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पुणतांबा (जि. अहमदनगर) : राज्य सरकारने ३४ हजार कोटी रूपयांची जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे. संपूर्ण सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी २१ जुलैपासून पुणतांब्यात बेमुदत उपोषणास बसणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार (मुंबई) यांनी सोमवारी पुणतांबा येथील गाव सभेत दिली.
अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर चव्हाण होते. नामदेव धनवटे, प्रताप वहाडणे, दत्ता आवारी, बाळासाहेब चव्हाण, सोपान पेटकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. कर्जमाफीचे श्रेय पुणतांबेकरांनाच आहे. काही राजकीय पक्ष श्रेय घेत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Festivity again since 21st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.