शाळेच्या शौचालयात सापडला गर्भ

By admin | Published: December 28, 2016 01:25 AM2016-12-28T01:25:40+5:302016-12-28T01:25:40+5:30

शाळा व कॉलेज इमारतीच्या शौचालयात गर्भपात झाल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासाकरिता

Fetus found in school toilet | शाळेच्या शौचालयात सापडला गर्भ

शाळेच्या शौचालयात सापडला गर्भ

Next

नवी मुंबई : शाळा व कॉलेज इमारतीच्या शौचालयात गर्भपात झाल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासाकरिता पोलिसांनी याठिकाणी सापडलेले मृत गर्भाचे अवशेष चाचणीसाठी पाठवले आहेत. विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या एमजीएम शाळा व महाविद्यालयाच्या इमारतीमध्येच हा प्रकार घडला आहे.
शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच नेरूळचे एमजीएम शाळा व कॉलेज पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. याठिकाणी शाळा व कॉलेज एकाच इमारतीमध्ये चालवले जात आहे. तिसऱ्या मजल्यावरील महिला शौचालयात शनिवारी सकाळी गर्भपात झाल्याचे आढळले.
महिला सफाई कामगार त्याठिकाणी काम करत असताना शौचालयाच्या भांड्यालगत रक्ताचे डाग दिसले. यामुळे त्यांनी निरखून पाहिले असता, शौचालयाच्या भांड्यामागे एक-दीड महिन्याचा गर्भाचा गोळा आढळून आला. महिला कामगाराने याची माहिती शाळा व्यवस्थापनाला दिली. मृत गर्भाचे हे अवशेष चाचणीसाठी पाठवल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील ज्या शौचालयात हा मृत गर्भ सापडले, ते शौचालय शाळा व कॉलेजच्या विद्यार्थिनींसह महिला शिक्षिकांच्या वापरासाठी आहे. यामुळे त्याठिकाणी ये-जा झालेल्या महिला व विद्यार्थिनींच्या चौकशीचे मोठे आव्हान नेरूळ पोलिसांपुढे आहे. याच शाळेत सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने वर्गातच बलात्कार केल्याची उघड झाले आहे. गुन्हे शाखेमार्फत अटकेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन व संबंधित शिक्षकाची चौकशी सुरू असतानाच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे हे शाळा व्यवस्थापन पुन्हा एकदा वादात सापडले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fetus found in school toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.