एक ताप,धोका चार आजारांचा

By Admin | Published: June 23, 2016 03:56 AM2016-06-23T03:56:44+5:302016-06-23T03:56:44+5:30

कडकडीत उन्हामुळे मुंबईकरांची लाही लाही होत होती. पण पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईकर सुखावले आहेत. पावसानंतर हवामानातील बदलामुळे मुंबईकरांची तब्येत खराब होऊ शकते

A fever, four illnesses in danger | एक ताप,धोका चार आजारांचा

एक ताप,धोका चार आजारांचा

googlenewsNext

मुंबई : कडकडीत उन्हामुळे मुंबईकरांची लाही लाही होत होती. पण पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईकर सुखावले आहेत. पावसानंतर हवामानातील बदलामुळे मुंबईकरांची तब्येत खराब होऊ शकते. यावेळी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण ताप अंगावर काढल्यास मुंबईकरांना मलेरिया, डेंग्यू किंवा स्वाइन फ्लू अथवा लेप्टो होण्याचा धोका आहे.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत लेप्टोची साथ पसरली होती. गेल्या दोन दिवसांत मुंबईत झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. पायाला जखम असताना साठलेल्या पाण्यातून चालत गेल्यास लेप्टोस्पायरा हे विषाणू शरीरात जाण्याचा धोका असतो. आणि त्यामुळे लेप्टाची लागण होऊ शकते. पुढच्या काही दिवसांत ताप
आल्यास तो अंगावर काढू नये, असे आवाहन महापालिकेने केले
आहे.
कोणालाही ताप आला असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. रक्त तपासणी करावी. कारण साथीच्या आजाराचे प्राथमिक पातळीवर निदान झाल्यास आजार लवकर बरा होतो आणि गुंतागुंत होत नाही. डॉक्टरकडे गेल्यावर साचलेल्या पाण्यातून चालत गेले असल्यास तेही नक्की सांगा, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे.
घराभोवती स्वच्छता ठेवा. एसीमधील पाणी काढून टाका, करवंट्या, अडगळीच्या ठिकाणच्या वस्तू काढून टाका, गच्ची स्वच्छ करून घ्या, पाणी साठू देऊ नका, स्वच्छता ठेवा, असेही डॉ. केसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

महापालिका पाच महिन्यांपासून प्रयत्नशील
पावसाळा सुरु होण्याआधीच साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने चांगलीच कंबर कसली होती. डेंग्यू, मलेरिया हे साथीचे आजार साठलेल्या पाण्यात उत्पत्ती होणाऱ्या डासांमुळे होतात. टायर, ताडपत्री, अडगळीच्या वस्तूंमध्ये पावसाळ््यात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत महापालिकेने डास प्रतिबंधासाठी महापालिकेने शहरातील ३ हजार १७५ टायर्स हटविले. तर, १ लाख ८८ हजार ६१६ वस्तू देखील काढून टाकल्या. टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे अथवा इतर पाणी साचते.
यामध्ये अगदी थोड्याप्रमाणात साचलेल्या अथवा असणाऱ्या पाण्यात देखील डास अंडी घालतात. त्यामुळे गेल्या ५ महिन्यांपासून महापालिका कार्यवाही करत होती. या कार्यवाहीत ‘जी दक्षिण’ आणि ‘एम पश्चिम’ विभागात सर्वाधिक म्हणजे ३१६ टायर हटविण्यात आले आहेत.
त्या खालोखाल ‘एम पूर्व’ विभागातून २५७ आणि ‘आर उत्तर’ २४५ टायर हटविण्यात आले आहेत. तर सर्व २४ विभागातून ३ हजार १७८ टायर हटविण्यात आले आहेत. तर, ३० हजार ४२३ वस्तू ‘जी उत्तर’ विभागातून हटविण्यात आल्या आहेत. खालोखाल २८ हजार १९८ वस्तू या ‘इ’ विभागातून हटविण्यात आल्या आहेत. २४ विभागातून १ लाख ८८ ६१६ इतर वस्तू हटविण्यात आल्या आहेत.

हे जरूर करा
पाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात स्वच्छ धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाका
हे टाळा!
न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळा, पावसात अधिक काळ भिजू नका


पावसाळ््यात
होणारे आजार

ताप : लक्षणे - कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणे
लेप्टोस्पायरसिस : लक्षणे - थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोळे लाल होणे, काहीवेळा त्वचेवर रॅश येणे
स्वाइन फ्लू : लक्षणे - सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी
गॅस्ट्रो : लक्षणे - पोटाच्या वरच्या भागात दुखणे, अन्नावरची इच्छा उडणे, उलट्या, ढेकरा येणे, भूक मंदावणे
कावीळ : लक्षणे - अस्वस्थता वाटणे, सांधे दुखी, ताप, उलट्या किंवा अन्नावरची इच्छा उडणे, डोकेदुखी
टायफॉइड : लक्षणे - भूक कमी लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप (४ डिग्रीपर्यंत जाऊ शकतो), सुस्तपणा येणे, उलट्या होणे, अन्नावरची इच्छा उडणे
कॉलरा : लक्षणे - जुलाब, डायरिया, अशक्तपणा येणे, डिहायड्रेशन, पोटदुखी
डासांमुळे होणारे आजार
मलेरिया : लक्षणे - ताप, थंडी वाजणे, सांधे दुखणे, उलट्या होणे
डेंग्यू : लक्षणे - ताप, स्नायू दुखणे, सांधे दुखी, डोके दुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे
चिकनगुनिया : लक्षणे - आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताप येणे, डोकेदुखी, तीव्र सांधेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे किंवा उलट्या होणे, डोळ््यांचा दाह होण

जून २०१५
आजाररुग्ण
मलेरिया६०९
डेंग्यू३८
टायफॉइड१०२
गॅस्ट्रो१०२३
लेप्टो ४
कावीळ९९

२० जून २०१६
आजाररुग्ण
मलेरिया२८०
डेंग्यू२७
टायफॉईड७९
गॅस्ट्रो५७९
लेप्टो ६
कावीळ८२

Web Title: A fever, four illnesses in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.