‘ताप’ वाढला

By admin | Published: September 19, 2014 11:31 PM2014-09-19T23:31:57+5:302014-09-19T23:31:57+5:30

शहर आणि तालुक्यात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला आहे. मोठय़ा प्रमाणावर नागरिकांना तापाने ग्रासले आहे.

'Fever' grew | ‘ताप’ वाढला

‘ताप’ वाढला

Next
बारामती : शहर आणि तालुक्यात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला आहे. मोठय़ा प्रमाणावर  नागरिकांना तापाने ग्रासले आहे. काही दिवसांपासून पावसामुळे  ठिकठिकाणी साचलेली डबकी, घाणीचे साम्राज्य यामुळे डेंग्यू, मलेरिया, हिवताप यांसारख्या आजारांनी तोंड वर काढले आहे. 
 गेल्या दीड महिन्यापासून बारामती शहरात डेंग्यूने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्यापूर्वी विषाणूजन्य आजाराने बारामती आणि परिसरातील नागरिकांना ग्रासले होते. बारामती शहरातील कसबा, तांदूळवाडी, खाटीक गल्लीमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रसिध्द केले होते. 
महावितरणच्या चार अधिकारी व पाच कर्मचा:यांनाही डेंग्यूची लागन झाली आहे. शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकेने प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. 
बारामती शहरातील इंदापूर रस्त्यावर जवळपास 25 हून अधिक रुग्णालये आहेत. येथील प्रत्येक रुग्णालयात रूग्णांची गर्दी दिसत आहे. प्रत्येक रुग्णालयात दररोज डेंग्यूने त्रस्त असलेले किमान 4 ते 5 रुग्ण दाखल होत आहेत. सरासरी 15 ते 2क् लोक डेंग्यूमुळे त्रस्त असल्याचं धक्कादायक सत्य समोर आले आहे.   
शहर व तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. विषाणूजन्य आजाराबरोबरच रिक्टेशिअल फिवर, डेंगी या आजारांचे रुग्ण संख्येने अधिक आहेत. ताप येणो, डोके दुखी, अंग दुखणो आदी लक्षणो या रुग्णांमध्ये आढळून येत असल्याची माहिती भाग्यजय हॉस्पिटलचे डॉ. आर. डी. वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  
देवकाते रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रेमेंद्र देवकाते यांनी सांगितले की, सध्या रुग्णालयात विविध परिसरातील 15 डेंगीचे रुग्ण दाखल आहेत. तसेच, सरासरी रोज 4 ते 5 रुग्ण दाखल होत आहेत. नागरिकांनी या संदर्भात दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
 
प्रशासनानेही डेंग्यूच्या साथीवर गेल्या काही दिवसांपासून उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, बारामती शहर व तालुक्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये डेंग्यूवर उपचार करणारी यंत्रणा सज्ज आहे.
- डॉ. महेश जगताप, 
तालुका वैद्यकीय अधिकारी. 
 
जिल्ह्यात वातावरणात बदल झाला आहे. सकाळी थंडी दुपारी कडक ऊन, तर रात्नी पुन्हा थंडी असे वातावरण आहे. त्यातच ग्रामीण भागातून कमालीची अस्वच्छता व डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विषाणूजन्य तापाने कुटुंबच्या कुटुंबं आजारी पडले आहे. बारामतीत, तर डेंग्यूने उच्छाद मांडला आहे. महावितरणच्या अधिका:यांसह  9 जणांना  डेंग्यूची लागण चाकणला दररोज सरारसरी अडीचशे रुग्ण ग्रामीण रुग्णालयात नोंद होत आहेत. उरळी कांचन येथे एक तर अवसरीत दोन डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत.
 
4बारामती नगरपालिका प्रशासनाने शहरात 
32 पथकांमार्फत डेंग्यूचा काही दिवसांपूर्वी सव्र्हे केला आहे. यामध्ये बहुतांश ठिकाणी डेंग्यू आजाराला कारणीभूत ठरणा:या डासांच्या अळ्या सापडल्या.  
4388 घरांमध्ये 485 दूषित पाणीसाठे आढळले. 15, 66क् घरांचा सव्र्हे पूर्ण झाला आहे. त्यानंतर नगरपालिकेने शहरात कोरडा दिवस पाळला.  मात्र, त्यानंतरदेखील डेंग्यूचे सत्र सुरूच आहे. 
 
 दिवसा ऊन-पाऊस आणि रात्नी गारवा यामुळे बदलत्या हवामानात विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे घरा-घरांत सर्दी, खोकला, विषाणूजन्य तापाचा संसर्ग होऊन कुटुंबच आजारी पडू लागली आहेत. विषाणू संसर्ग होण्याचा कालावधी वाढत असल्याने, आजाराचा कालावधीही वाढत आहे. त्यामुळे शाळांपासून ते नोकरीच्या ठिकाणार्पयत विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णांचीची संख्या वाढू लागल्याचे व पावसाळ्यात अशा तक्रारी घेऊन येणा:या रुग्णांची संख्या प्रत्येक वर्षीच वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
 
चाकण :  चाकण परिसरात विषाणूजन्य तापाची साथ असून, वेगवेगळ्या तापाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढच होत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात विषाणूजन्य ताप पसरत आहे. खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत आहे. मागील आठवडाभरापासून रुग्णालयात प्रत्येक दिवशी सरासरी तीनशे रुग्ण येत आहेत. त्यातील पन्नास ते सत्तर रुग्ण विषाणूजन्य तापाने फणफणल्याचे निरीक्षण वैद्यकीय अधिका:यांनी नोंदविले आहे. यातील काही संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.  
 शासकीय, तसेच खासगी रुग्णालयात हजारो रुग्णांवर औषधोपचार करण्यात येत आहेत. आठवडाभरात चाकण ग्रामीण रुग्णालयात तब्बल सव्वादोन हजार रुग्णांनी अशा तक्रारीही केल्याचे बाह्य रुग्ण विभागातील नोंदीवरून दिसून येत आहे. 
स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष व डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंगीच्या रुग्णांतही वाढ होत असल्याचे चित्न आहे. उष्ण व दमट वातावरण पोषक असल्यामुळे डासांची संख्या वाढत आहे. 
चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. केदारे यांनी याबाबत सांगितले की, चाकण ग्रामीण रुग्णालयात दररोज किमान 25क् ते 3क्क् रुग्ण येत असून, त्यातील 5क् ते 7क् रुग्ण अशाच प्रकारच्या विषाणूजन्य तापाच्या तक्रारी करीत आहेत. त्या सर्वावर येथे उपचार करण्यात येत असून, काही संशयित रुग्णांच्या रक्त तपासणी करण्यात येत आहेत. (वार्ताहर)
 
स्वच्छतेकडे दुर्लक्ष 
4मागील वर्षी याच कालावधीत चाकण-आंबेठाण रस्त्यालगत असलेल्या एका गृह प्रकल्पातील पाच वर्षाच्या चिमुरडय़ाला आणि खंडोबामाळ भागातील एका महिलेला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता पुन्हा या तापाने डोके वर काढल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. 
4जागोजागी अस्ताव्यस्त पडलेला कचरा, सांडपाणी, निचरा न झाल्याने साचलेले पावसाचे व सांडपाण्याचे डोह यामुळे चाकण मध्ये डेंग्यू, मलेरिया, हवेतील जंतुसंसर्गाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पाण्यात औषधे टाकणो आणि धुरळणी करणो यासारखे प्राथमिक  उपाय ही नियमितपणो करण्यात येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
 

 

Web Title: 'Fever' grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.