कृषी संशोधनामध्ये देश जगाच्या मागे - मोदींनी व्यक्त केली खंत

By admin | Published: November 13, 2016 07:55 PM2016-11-13T19:55:40+5:302016-11-13T19:55:40+5:30

कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.

In the field of agricultural research, the country is behind the world | कृषी संशोधनामध्ये देश जगाच्या मागे - मोदींनी व्यक्त केली खंत

कृषी संशोधनामध्ये देश जगाच्या मागे - मोदींनी व्यक्त केली खंत

Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही,  अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.
मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथे आयोजित शुगरकेन परिषदेच्या उद्घाटनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केले.  पंतप्रधान म्हणाले, "कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही. आज शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पोत स्वत: तपासला पाहिजे. कृषीविद्यापीठांमधून तसेच जास्तीत जास्त लांब उसकाडी कशी तयार होईल यासाठी संशोधन व्हायला हवे."
पंतप्रधान पुढे म्हणाले, "खाडीऐवजी झाडीच्या तेलाला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी इथेनालच्या उत्पादनाकडेही लक्ष द्यायला हवे. ब्राझीलने इथेनॉला चांगला उपयोग करत आहे. भारतातही इथेनालची निर्मिती आणि वापर वाढविला पाहिजे. इथेनॉल बनविण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत."
यावेळी नोटबंदीवर भाष्य करताना पंतप्रधानांनी बनावट नोटांचा खेळ परकीय देश खेळतात. नक्षलवाद, दहशतवादाची मुळे छाटण्याची आवश्यकता होती. शेती उत्पादनाला कर लागेल हा विनाकारण भ्रम पसरविला जात आहे, मात्र असे काहीही होणार नाही, असेही सांगितले.  "५०० व १००० च्या सध्याच्या नोटांचे मूल्य १४ लाख कोटी इतके आहे. तरुण पिढीच्या भवितव्यासाठी या चलनातून बाद करणे आवश्यक होते. ७० वर्षाच्या आजारपणातून सुटका करण्यासाठी हे पाऊल गरजेचे होते. १००० च्या बदल्यात प्रत्येकाला १००० रुपयेच मिळतील, एक रुपयाही कमी देणार नाही. नोटांची व्यवस्था यापूर्वी करता आली असती मात्र त्यामुळे ही बातमी फुटण्याचा धोका होता. मला केवळ ३० डिसेंबर पर्यन्त ५० दिवसांची मुदत द्या, सर्व सुरळीत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.   
 

Web Title: In the field of agricultural research, the country is behind the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.