सर्वसाधारण जागेवर सौभाग्यवतीसाठी फिल्डिंग

By Admin | Published: July 21, 2016 02:14 AM2016-07-21T02:14:43+5:302016-07-21T02:14:43+5:30

लोणावळ्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या वलवण गावात सर्वसाधारणचे आरक्षण न पडता ही जागा अनुसूचित जातीकरिता आरक्षित

Fielding for the fortune in general space | सर्वसाधारण जागेवर सौभाग्यवतीसाठी फिल्डिंग

सर्वसाधारण जागेवर सौभाग्यवतीसाठी फिल्डिंग

googlenewsNext


लोणावळा : लोणावळ्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या वलवण गावात सर्वसाधारणचे आरक्षण न पडता ही जागा अनुसूचित जातीकरिता आरक्षित झाल्याने अनेक मातबर इच्छुकांच्या आशा-अपेक्षा धुळीला मिळाल्या आहेत. मात्र, नशिबाने साथ दिली नसली, तरी दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने मातबरांनी सौभाग्यवतींसाठी या जागेवर हक्क सांगायला सुरुवात केल्याने पक्षश्रेष्ठींसाठी ही चढाओढ डोकेदुखी ठरणार आहे. लोणावळ्याच्या राजकारणात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याने शहरात पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक करिष्मा व त्याला लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाची जोड देऊनच निवडणुका लढविल्या जातात. मागील काही वर्षांचा इतिहास पाहता वलवण गावातील नगरसेवकांना सर्वाधिक वेळा अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. मागील वर्षीच्या वलवण व नांगरगाव या प्रभागातील सर्वच नगरसेवक हे वलवण गावातील होते. त्यामध्ये सुनील इंगुळकर, अनिल पानसरे, शकुंतला इंगुळकर व रुपाली जाधव यांचा समावेश आहे. वलवणगावाचा विचार केला, तर पाच वर्षांत या प्रभागातील कालेकर मळा, डेनकर कॉलनी व राव कॉलनी वगळता गाव भागात एकही सांगता येईल असे काम न झाल्याने विद्यमान मंडळींना हा विकास विचार करायला लावणारा आहे.
या प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने येथून माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, रुपाली जाधव, शकुंतला इंगुळकर, माधुरी पाळेकर, कल्पना पानसरे यासह पाळेकर, इंगुळकर, जाधव, होगले, नांदवटे, जांभळे, तारे आदी बड्या घरांमधील इच्छुकांनी सौभाग्यवतीसाठी दावा केला आहे. तर दुसऱ्या जागेसाठीच्या इच्छुकांत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, अमोल गायकवाड, अभिजित देसाई आदींचा समावेश आहे.
> प्रभाग रचना : उत्तरेकडून सिल्व्हर व्हॅली ते वलवण धरणापर्यंतच डक्टलाइन, पूर्वेकडे वरसोली गावाची हद्द आहे. दक्षिणेकडे रेल्वे गेस्ट हाऊस ते बापदेव मंदिरापर्यंतचा रस्ता ते राव कॉलनी ते डेनकर कॉलनीची हद्द. कालेकर मळा ते मास बिल्डरपर्यंतचा रस्ता ते रॉन्व रिअ‍ॅलिटी हद्द, सर्वे नं. १३४ ते स्पोर्ट कॉम्प्लेक्स आरक्षणपर्यंतचा रस्ता, स. नं. ११५ ते खत्री पार्क सोसायटीलगतची इंद्रायणी नदी
ते वरसोली गावाची हद्द व पश्चिमेला सिल्व्हर व्हॅली ते दस्तगीर गॅरेज, रेल्वे गेस्ट हाऊसपर्यंतचा रस्ता.

Web Title: Fielding for the fortune in general space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.