विधान परिषदेसाठी आतापासून फिल्डिंग; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार

By अतुल कुलकर्णी | Published: February 23, 2018 06:01 AM2018-02-23T06:01:09+5:302018-02-23T06:13:34+5:30

विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.

Fielding for Legislative Council; If the seats of NCP will be reduced, the BJP will grow | विधान परिषदेसाठी आतापासून फिल्डिंग; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार

विधान परिषदेसाठी आतापासून फिल्डिंग; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार

Next

मुंबई : विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे. त्यात चार जागा राष्टÑवादीच्या असून आहे ते संख्याबळ आणि काँग्रेसला दिलेला शब्द यासाठी त्यांना तीन जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे किमान दोन जागा कशा मिळवता येतील यासाठी राष्टÑवादीची धडपड सुरू झाली आहे. राष्टÑवादीचे अ‍ॅड. जयदेव गायकवाड, सुनील तटकरे, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त व शरद रणपिसे तसेच भाजपाचे भाई गिरकर आणि महादेव जानकर तर शिवसेनेचे अनिल परब व शेकापचे जयंत पाटील या ११ आमदारांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.
काँग्रेस आणि राष्टÑवादीचे विधानसभेतील संख्याबळ ८३
आहे. त्यापैकी काँगे्रसचे कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे हे
काँग्रेस उमेदवारांना मतदान करतील की नाही याविषयी काँग्रेस नेतृत्वाला शंका आहे. त्यामुळे आहे त्या
८१ एवढ्या संख्याबळावर दोघांचे मिळून तीन आमदार कसेबसे
निवडून येऊ शकतात. राष्टÑवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांच्या मागील निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचा पाठिंबा घेताना पुढच्या निवडणुकीत
आम्ही तुम्हाला एक जागा सोडू
असे आश्वासन दिले होते. त्यामुळे
ती एक जागा आता राष्ट्रवादीने आम्हाला सोडावी असे काँग्रेसचे म्हणणे आहे. कारण यावेळी काँग्रेसच्या तीन आमदारांची
मुदत संपणार आहे. त्यात माणिकराव ठाकरे हे सध्या उपसभापती आहेत आणि पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्यांशी त्यांचे सख्य आहे. शरद रणपिसे व संजय दत्त यांच्यापैकी कोणाची निवड होणार हा प्रश्न कायम आहे.
शिवसेनेचे विधानसभेत ६३ आमदार आहेत. ते दोन आमदार आरामात निवडून आणू शकतात. तरीही त्यांच्याकडे काही मते शिल्लक राहतील. त्यामुळे अनिल परब यांना पुन्हा संधी देताना सेना दुसरी
जागा कोणाला देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यासाठी नुकतेच सचिव झालेले मिलींद नार्वेकर जोरदार प्रयत्न करत आहेत. काँग्रेस, राष्टÑवादीतील आपापसातील मारामारी पहाता शेकापचे जयंत पाटील यांना विधानसभेतून निवडून येणे अवघड आहे. ते उभे राहिले तर विरोधकांचीच अडचण होणार
आहे. रायगड स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेल्या अनिल तटकरे यांची मुदत ३१ मे रोजी
संपत आहे. त्यांची जागी जयंत पाटील यांना देऊन स्थानिक राजकारण सांभाळायचे व त्याचा फायदा लोकसभा, विधानसभेला घ्यायचा
की पुन्हा अनिल तटकरेंनाच संधी द्यायची याचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यायचा आहे.

या सगळ्यात भाजपाचा मात्र फायदा होणार आहे. त्यांचे दोन विद्यमान आमदार तर निवडून येतीलच शिवाय आणखी चौघांना त्यांना निवडून आणणे शक्य होणार आहे. राष्टÑवादीचे विद्यमान आ. व माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना या राष्टÑवादीतून संधी मिळणार नाही हे लक्षात आले आहे. त्यामुळे ते भाजपाशी संधान साधून असल्याचे सांगितले जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांनी नवी मुंबईत दोन मोठे कार्यक्रमही घेत भाजपात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांच्यामुळे भाजपाकडे कामगार नेता येऊ शकतो. मात्र पुन्हा पक्षाबाहेरच्या लोकांनाच संधी देत भाजपाच्या निष्ठावंतांना आणखी कितीवेळा डावलणार असे सवाल पक्षात सुरु झाले आहेत.

Web Title: Fielding for Legislative Council; If the seats of NCP will be reduced, the BJP will grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.