देशात पाच ठिकाणी आत्मघाती हल्ल्याची फेसबुकवरून धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 05:56 AM2019-05-23T05:56:08+5:302019-05-23T05:56:10+5:30

‘ती’ पोस्ट विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल : जळगाव सायबर पोलिसांनी तपासणीसाठी ‘फेसबुक’ला पाठविला मेल

Fierce attacks in five places in the country threaten Facebook | देशात पाच ठिकाणी आत्मघाती हल्ल्याची फेसबुकवरून धमकी

देशात पाच ठिकाणी आत्मघाती हल्ल्याची फेसबुकवरून धमकी

googlenewsNext

जळगाव : शहरातील अतिया रिचार्ज नावाच्या फेसबुक अकाउंटवरून स्वत: ला मोहम्मद कलीमउद्दीन खान म्हणून घेणाऱ्या व्यक्तीने देशातील प्रमुख पाच शहरांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे़ धमकीची ती पोस्ट बुधवारी दिवसभर शहरातील विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाली. त्यामुळे शहरासह सुरक्षा यंत्रणामध्ये एकच खळबळ उडाली.


पोस्ट टाकणाºया संशयिताचा जळगाव सायबर पोलीस शोध घेत आहेत़ दुसरीकडे अमेरिकेतील फेसबुक कंपनीलाही सायबर पोलिसांकडून मेल पाठविण्यात आला आहे़ पंतप्रधानांनी आतापासून सांभाळून रहायला हवे, अशी धमकीही यात देण्यात आली आहे.
फेसबुकवर अतिया रिचार्ज नावाच्या फेसबुक अकाउंटवर टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा असून संशयिताने स्वत:चे नाव मोहम्मद कलीमउद्दीन खान असे सांगितले आहे़ तसेच तो स्वत: ला जैश-ए-मोहम्मदचा एक जिहादी असल्याचे सांगत आहे़ देशातील प्रमुख पाच शहरांमध्ये आत्मघाती हल्ला करण्यासाठीचा दारूगोळा व सुसाईड बॉम्बगोळा पोहोचला आहे़ पुलवामा येथे झालेला हल्ला फक्त नमुना होता़ पंतप्रधानांनी आतापासून सांभाळून रहायला हवे, असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे़

पीएमओवरही हल्ल्याची धमकी
पंतप्रधान कार्यालय येथे काहीही होऊ शकते़ कोट्यवधी जमा करून हे काम पूर्ण केले आहे़ आमच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आम्ही हे करीत असून माझ्यासोबत माझी पत्नी शरीक-ए-हयात इरशाद बेगम खान, भाऊ मोहम्मद रहीमउद्दीन खान हे सुद्धा असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे़

जळगावात होता रहिवास
मोहम्मद कलीमउद्दीन खान हा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. त्याचे जळगावच्या मेहरुण भागातील शेरा चौकात अतिया रिचार्ज हे दुकान होते. त्याने वेबसाईट तयार करुन सुमारे १७ लाख ४५ हजार ३२४ रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध सायबर पोलिसांत १० जानेवारी २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार आहे.

Web Title: Fierce attacks in five places in the country threaten Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.