मेट्रो हाऊसच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीवर अखेर नियंत्रण
By admin | Published: June 2, 2016 08:55 PM2016-06-02T20:55:13+5:302016-06-02T21:55:29+5:30
दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या कुलाबा कॉजवे येथील रिगल चित्रपगृहानजीक चार मजली मेट्रो हाऊसमध्ये आज संध्याकाळी अचानक आगीचा भडका उडाला.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2- दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या कुलाबा कॉजवे येथील रिगल चित्रपगृहानजीक चार मजली मेट्रो हाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीवर अग्निशमन दलानं अखेर नियंत्रण मिळवलं आहे. सध्या इमारतीत कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. जवळपास 6 तासांहून अधिक काळ या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नौदल आणि अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. जुनी इमारत व लाकडी फर्निचर असलेल्या या इमारतीमध्ये आगीने अचानक पेट घेतला होता. त्याचत छतावरील डांबरामुळे ही आग पसरून आसपासच्या इमारतीलाही वेढले होते. मदतकार्यादरम्यान पाणीच संपल्यामुळे नौदल व खासगी टँकरची मदत घेण्यात आली.
मेट्रो हाऊस या जुन्या इमारतीमध्ये चारच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील व्हीन्स गेस्ट हाऊसमध्ये स्पार्क उडाला. यामुळे वातानुकूल यंत्राने पेट घेतला. त्यातच शॉटसर्किट आणि सिलिंडरच्या स्फोटामुळे आग वाढून वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. या इमारतमध्ये प्रसिद्ध कॅफे मॉन्डीगेर आणि मॅकडोन्लडचे दुकान आहेत. मात्र येथे खेटून असलेल्या इमारती, चिंचोळे रस्ते आणि लाकडी जिने, फर्निचरमुळे आग वाढतच गेली होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आगीचे १८ बंब आणि पाण्याचे ११ टँकर घटनास्थळी होते. तसेच चार रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या होत्या. मात्र खबरदारी म्हणून आसपासच्या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. आग लागलेल्या इमारतीमधील दोन महिलांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
- चौकशीची मागणी
महापौर स्नेहल आंबेकर आणि आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळाची रात्री पाहणी केली. स्थानिक खासदार अरविंद सावंत हेदेखील घटनास्थळी होते. त्यांनी या आगीच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे.