फिफा प्रमुख इनफेंटिनो २७ रोजी गोव्यात
By admin | Published: September 10, 2016 07:08 PM2016-09-10T19:08:00+5:302016-09-10T19:08:00+5:30
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष जियानी इनफेंटिनो हे आशियाई फुटबॉल परिसंघ (एएफसी) च्या विशेष कॉँग्रेसमध्ये भाग घेण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी गोव्यात येणार आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
एकदिवसीय भारतीय दौरा : १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या लोगोचे अनावरण
पणजी, दि. 10 - आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष जियानी इनफेंटिनो हे आशियाई फुटबॉल परिसंघ (एएफसी) च्या विशेष कॉँग्रेसमध्ये भाग घेण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी गोव्यात येणार आहेत. त्यांचा हा भारतीय दौरा निश्चित आहे. फिफा परिषदेमध्ये एएफसीच्या तीन अतिरिक्त सदस्यांची निवड केली जाणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) याबाबत माहिती दिली. त्यानुसार, इनफेंटिनो हे केवळ एका दिवसाच्या भारतीय दौºयावर गोव्यात २७ रोजी पोहचतील. त्या दिवशी ते प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करतील. त्यानंतर त्यांच्या हस्ते १७ वर्षांखालील विश्वचषकाच्या लोगोचे अनावरणही करण्यात येईल. या छोट्या कार्यक्रमानंतर इनफेंटिनो स्वित्झर्लंड येथील मुख्य कार्यालयाकडे परततील.
दरम्यान, एएफसी निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी पाच उमेदवार शर्यतीत आहेत. यामध्ये चीनचे झांग जियान, इराणचे अली कफशियान नाएनी, कोरियाचे मोंग जियू चुंग, कतारचे सउदी ए अजीज अल मोहम्मदी आणि सिंगापूरचे जैनुद्दीन नूरदीन यांचा समावेश आहे. याशिवाय परिषदेच्या महिला सदस्यासाठी एका जागेसाठी सुद्धा निवडणूक होईल. यामध्ये आॅस्ट्रेलियाच्या मोया डोड, बांगलादेशच्या महफजा अख्तर आणि उत्तर कोरियाच्या हान युएन यांचा समावेश आहे.