वसईमधल्या 'त्या' पुलाचं पाचव्यांदा उद्घाटन

By admin | Published: June 25, 2016 08:23 PM2016-06-25T20:23:53+5:302016-06-25T20:27:50+5:30

उद्घाटन होत नाही म्हणून वैतागून वसईकरांनीच उद्घाटन केलेल्या पंचवटी उड्डाण पुलाचं पाचव्यांदा उद्घाटन करण्यात आलं आहे

The fifth anniversary of 'That' Bridge in Vaishamadheya | वसईमधल्या 'त्या' पुलाचं पाचव्यांदा उद्घाटन

वसईमधल्या 'त्या' पुलाचं पाचव्यांदा उद्घाटन

Next
>ऑनलाइन लोकमत - 
वसई, दि. 25 - उद्घाटन होत नाही म्हणून वैतागून वसईकरांनीच उद्घाटन केलेल्या  पंचवटी उड्डाण पुलाचं पाचव्यांदा उद्घाटन करण्यात आलं आहे. वादात सापडलेल्या या पुलाचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांनी पुलाचं उद्धाटन केल्यानंतर एमएमआरडीएने पुल पुन्हा बंद केला होता. पण त्यानंतर परत मनसे, जन आंदोलन समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या पुलाचं वेगवेगळ्या दिवशी उद्धाटन केलं होतं. मात्र अखेर पुलाला सरकारी मुहूर्त मिळाला आणि पाचव्यांदा विष्णू सावरा आणि हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 

(त्रासलेल्या वसईकरांनी उद्धाटन केलेला फ्लायओव्हर MMRDAने केला बंद)
 
वसईच्या पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाऱ्या या पूलाचे काम गेल्या ९ वर्षांपासून संथगतीने सुरु होते.२००६ ला काम सुरु झालेल्या या ७३६ मीटर लांब आणि ११ मीटर रूंदीच्या या पूलाला तब्बल ९ वर्षे लागली. आता गेल्या पंधरवड्यापासून तो वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. या पूलावरील संरक्षक कठड्याचे काम बाकी असल्यामुळे तो खुला करण्यात येत नसल्याचे कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य अभियंत्यांनी दिले होते.
 
(उदघाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते)
 
वसईकरांनी स्वत: उद्घाटन केलेला फ्लायओव्हर एमएमआरडीएने पुन्हा बंद केला होता. गेले कित्येक दिवस वाट पाहत असूनही पुलाचं उद्धाटन होत नसल्याने वैतागलेल्या वसईकरांनी स्वत: या पुलाचं उद्धाटन केलं होतं. मात्र सर्वसामान्यांनी पुलाचं उद्घाटन केल्याचं एमएमआरडीएला रुचलं नाही. आणि त्यांनी पुन्हा एकदा फ्लायओव्हर बंद केला होता. एमएमआरडीएच्या या भुमिकेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. 
 
चार वेळा लुटूपुटूचे उद्घाटन केले गेल्याने वसईच्या पंचवटी उड्डाण पुलाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याची उपहासात्मक चर्चा वसईत केली जात होती. ऐन गर्दीच्या वेळीच दररोज उद्घाटन होत असल्याने शेवटी एमएमआरडीएने पुलावर फलक लावून येत १५ दिवसात पूल वाहतूकीसाठी खुला करू अशी हमी दिली होती.
 
पाच वेळा झालं उद्घाटन
15 जून रोजी नागरिकांकडून उद्घाटन
16 जून रोजी मनसे
17 जून रोजी जनआंदोलन समिती
18 जून राष्ट्रवादी काँग्रेस
25 जून पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते उद्घाटन
 
लिम्का बुकमध्ये नोंद होणार ?
चार वेळा उद्घाटन करून खुला झालेला वसईतील हा पूल देशातील एकमेव उदाहरण असेल. चारही वेळा वेगवेगळ्या व्यक्ती, पक्षाने उद्घाटन केल्यामुळे त्याचे वेगळेपणही ठळकपणाने जाणवणार आहे. त्यामुळे या आगळ्या-वेगळ्या विक्रमाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डकडून नक्कीच दखल घेतली जाईल अशी उपहासात्मक चर्चा केली जात आहे.
 

Web Title: The fifth anniversary of 'That' Bridge in Vaishamadheya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.