चार विवाह केल्यानंतर पाचवीचीही फसवणूक

By Admin | Published: May 31, 2017 03:45 AM2017-05-31T03:45:49+5:302017-05-31T03:45:49+5:30

आधी चार विवाह केलेले असतानाही स्वत:चा फ्लॅट आणि करोडोंची गुंतवणूक असल्याचे सांगून संजय वर्मा याने पाचवे लग्न केले

Fifth cheating after four marriages | चार विवाह केल्यानंतर पाचवीचीही फसवणूक

चार विवाह केल्यानंतर पाचवीचीही फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आधी चार विवाह केलेले असतानाही स्वत:चा फ्लॅट आणि करोडोंची गुंतवणूक असल्याचे सांगून संजय वर्मा याने पाचवे लग्न केले. पाचव्या पत्नीलाही दहा लाखांना गंडा घालून आणि मारहाण करून ठार मारण्याची त्याने धमकी दिली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबईच्या गोरेगाव येथील अलंकार सोसायटीतील रहिवासी असलेला संजय (३८) याने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संकेतस्थळाचा वापर करून ठाण्यातील ३७ वर्षीय महिलेचा मोबाइल क्रमांक मिळविला. तिच्याशी संपर्क साधून पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला असून एक मुलगाही असल्याचे त्याने सांगितले. स्वत:चा फ्लॅट, करोडो रुपयांची गुंतवणूक आणि चांगल्या ठिकाणी नोकरीही असल्याची त्याने बतावणी केली. त्यातूनच ओळख वाढवून तिला लग्न करण्यास भाग पाडले. तिच्याकडून त्याने लग्नापूर्वी आणि लग्नानंतर सप्टेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीत वेगवेगळ्या बहाण्याने दहा लाख रुपये घेतले. दरम्यान, त्याने अन्य दोन महिलांशीही लग्न करून त्यांना घटस्फोट न देता आपल्याशी विवाह केल्याचे तिच्या लक्षात आले. याचा तिने जाब विचारल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक छळ करून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. त्याने अन्यही काही महिलांना लग्नाचे अमिष दाखवून त्यांच्याशी लग्न करून त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या कारणाने पैसे घेऊन त्यांचीही फसवणूक करून पुन्हा जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर नाव नोंदविले आहे. तो आणखीही काही महिलांची फसवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. याप्रकरणी २९ मे रोजी या महिलेने त्याच्याविरुद्ध फसवणूक, हुंड्यासाठी छळ, धमकी देणे, मारहाण करणे अशा वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Fifth cheating after four marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.