पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

By Admin | Published: September 16, 2016 06:56 AM2016-09-16T06:56:19+5:302016-09-16T06:56:19+5:30

रिमझिम पावसात न्हाऊन निघालेली पुण्यनगरी, रांगोळ्यांच्या पायघड्या, बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर... अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला

The fifth person of Pune's Ganpati wins immersion | पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ : रिमझिम पावसात न्हाऊन निघालेली पुण्यनगरी, रांगोळ्यांच्या पायघड्या, बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर... अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला. सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेली मानाच्या गणपतींची मिरवणुक संध्याकाळपर्यत चालली. गणेशभक्तीचे नानाविध रंग या मिरवणुकीत पाहायला मिळाले. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही मानाच्या गणपतींचे विसर्जन हौदांमध्ये झाले.

१) पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती. चांदीच्या पालखीतून या बाप्पाची मिरवणूक निघाली. सनई चौघड्याला तुतारीची साथ, ढोलताशांच्या तालावर रंगलेला टिपरीचा खेळ, कलावंत तसंच कामायनीचं ढोलपथक या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य होतं.

२) तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघाली होती. या मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठा होता. इतिहास संशोधक मंडळाने सादर केलेल्या जिवंत देखाव्याने शिवरायांचा इतिहास जागवला.

३) मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची मिरवणुक फुलांच्या राजेशाही रथातून निघाली. ध्वजपथकाचा पदन्यासही चित्तवेधक होता. नेहमीप्रमाणे गुलालाची उधळण करत या गणपतीला निरोप देण्यात आला.

४) तुळशीबाग गणपतीची मूर्ती भव्य आणि देखणी आहे. फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथातून या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. ऑलंपिक २०२० च्या तयारीचा अनोखा रथ या मिरवणुकीत पाहायला मिळाला. विविध विषयांवरील समाजिक प्रबोधनपर रथदेखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

५) केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीत सनई चौघड्यांच्या जोडीला श्रीराम , शौर्य तसंच शिवमुद्रा ढोलताशा पथकं सहभागी झाली होती. त्याशिवाय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त सादर करण्यात आलेला देखावा लक्षवेधी होता.

Web Title: The fifth person of Pune's Ganpati wins immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.