सरपंचपदाच्या उमेदवारांकरिता निवडणुकीसाठी पन्नास ते पावणे दोन लाखापर्यंत खर्च मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:03 PM2017-08-21T18:03:40+5:302017-08-21T18:04:29+5:30

ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीतील उमेदवारांसाठी ग्रामपंचायतींच्या सदस्यसंख्येनुसार 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Fifty-five per cent of the expenditure limit for elections to Sarpanch candidates | सरपंचपदाच्या उमेदवारांकरिता निवडणुकीसाठी पन्नास ते पावणे दोन लाखापर्यंत खर्च मर्यादा

सरपंचपदाच्या उमेदवारांकरिता निवडणुकीसाठी पन्नास ते पावणे दोन लाखापर्यंत खर्च मर्यादा

googlenewsNext

मुंबई, दि. 21: ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीतील उमेदवारांसाठी ग्रामपंचायतींच्या सदस्यसंख्येनुसार 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे; तसेच सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत सुधारित खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार आता सरपंचपदाची थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या उमेदवारांकरिता राज्य निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा निश्चित केली आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी संपूर्ण ग्रामपंचायत हे प्रचार क्षेत्र असेल. सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकांसाठी आयोगाच्या 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार सरसकट 25 हजार रूपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली होती. त्यातही आता सदस्य संख्येनुसार बदल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदाच्या थेट निवडणुकीसाठी खर्च मर्यादा (रुपये)

ग्रामपंचायत सदस्य संख्या    सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी  सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी

7 व 9 सदस्य                              25,000                                    50,000
 
11 व 13 सदस्य                        35,000                                       1,00,000

15 व 17 सदस्य                        50,000                                    1,75,000

Web Title: Fifty-five per cent of the expenditure limit for elections to Sarpanch candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.