पाचशेच्या मुद्रांक शुल्कासाठी पावणेचार लाखांचा दंड
By admin | Published: July 23, 2016 01:46 AM2016-07-23T01:46:39+5:302016-07-23T01:46:39+5:30
मुद्रांक शुल्क व नोंदणी फी ३ लाख ७३ हजार ४०० रुपये १५ दिवसांत भरण्यात यावी, अशी नोटीस देण्यात आल्याने या शेतकऱ्यास धक्काच बसला
जय जवान - जय किसान : रॅलीत २० जवानांचा सहभाग
चंद्रपूर : भारतीय लष्कराच्या २० गार्ड बटालियनची सायकल रॅली भुसावळवरून औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, तुळजापूर, लातुर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती होत परत भुसावळला जात आहे. ही रॅली चंद्रपूर तालुक्यातील नकोडा येथे दाखल झाली.
या रॅलीचे नेतृत्व कॅप्टन अंकीत शर्मा हे करीत असून त्यांच्यासोबत २० गार्ड बटालियनचे जवान सहभागी आहेत. या सायकल रॅलीचा मुख्य उद्देश महाराष्ट्रभर ‘जय जवान, जय किसान’ हा उद्घोष करीत शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत करण्याचा आहे. तसेच हे सर्व जवान २० गार्ड बटालियनचे असल्यामुळे त्या सैनिकांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेट देणे आणि मानचिन्ह व टोपी देऊन त्यांचा सन्मान करणे हा आहे. नकोडातील एकूण १२ जवान भारतीय लष्करात आपली सेवा बजावित आहे. समीर रूषी मांदाडे, नितीन रूषी मांदाडे, शंकर संभाशिव देवतळे, नागोराव उरकुडे, राकेश कोवे, योगेश बाळा निखाडे, प्रवीण रामदास गावंडे, नरेश दिलीप बांदूरकर, महेश गिरडे, राकेश मुक्के, नागेंदर चव्हाण, गणेश नरड आणि संभाशिव देवतळे व सिध्दार्थ पाटील हे माजी सैनिक आहे. समीर रूषी मांदाडे हे २० गार्ड बटालियनमध्ये सेवारत असल्यामुळे भारतीय लष्कराच्या सायकल रॅलीने नकोडा येथे भेट दिली. त्यांनी समीर मांदाडे यांच्या कुटुंबियांंची भेट घेतली. त्यांना मानचिन्ह व टोपी देऊन सन्मान केला. नकोडा येथे रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. नकोडा येथील शालेय विद्यार्थ्यांनीसुद्धा रॅलीचे स्वागत केले. सरपंच तनुश्री बांदूरकर आणि जि.प. सदस्य ब्रीजभूषण पाझारे यांनी कॅप्टन अंकीत शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सायकल रॅली गावभर फिरविण्यात आली. हनुमान मंदिर येथे रॅलीला सरपंच तनुश्री बांदूरकर, जि.प. सदस्य ब्रीजभूषण पाझारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच रूषी कोवे, माजी उपसरपंच किरण बांदूरकर, ग्रामपंचायत सदस्य अंजय्या गोनपल्लीवार, नरेश एटकापेल्ली, ममता उरकुडे, संगिता पेरकावार, रंजना झाडे, कांचन वाकडे, ग्रामविकास अधिकारी ए.के. जेंगठे, पोलीस पाटील, सुमन ठमके, माजी सदस्य विकास पाटील, मोहम्मद हनिफ, माजी सैनिक संभाशिव देवतळे, प्रतिष्ठित नागरिक आर्वे गुरुजी, महादेव वाघमारे, ठाकरे, शंकय्या, डांगे, संगिता मानकर, शिला परागे, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद मेंढे, आशिष उरकुडे, आरोग्यसेवक काटप्पाजी, मंगेश राजगडकर, अतुल झाडे, संदीप बुरडकर, दिलीप कोवे, दिलीप भीवनकर, दिलीप बांदूरकर, बाळा निखाडे, जईंद्र मंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)