भरदिवसा व्यापार्यांचे ७ लाख लुटले
By admin | Published: May 15, 2014 10:32 PM2014-05-15T22:32:59+5:302014-05-15T22:43:09+5:30
वाशिम शहरामधील दोन व्यापार्यांकडून अज्ञात चोरट्यांनी बँकपरिसरामधून ७ लाख २0 हजार रूपये लुटून नेले.
वाशिम : शहरामधील दोन व्यापार्यांकडून अज्ञात दोन चोरट्यांनी बँक परिसरामधून ७ लाख २0 हजार रूपये लुटून नेले. या घटना जुना रिसोड नाक्यावरील जनता बँक समोर व विशाल स्कुटर समोर आज १५ मे रोजी दुपारी १२ वाजताचे सुमारास घडल्या. प्राप्त माहितीनुसार पाटणी चौकामध्ये असलेल्या रेणुका कॅफेचे संचालक १दिपक श्यामसुंदर मंत्री यांनी दररोज प्रमाणे दुकानामध्ये जमा झालेली रक्कम ३ लाख रूपये नोकर दत्ता लक्ष्मण लादे याचेकडे युको बँकमध्ये भरण्यासाठी दिली. दत्ता लादे याने ३ लाख रूपये भरलेली पिशवी आपल्या सायकलला लटकवून रिसोड रोडवर असलेल्या युको बँकेच्या दिशेने सकाळी ११:१0 वाजता जात होता. दरम्यान, पाठीमागुन मोटसायकलवर दोन अज्ञात युवक आले. त्यांनी लादे याच्या हातावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. लादे याला काही कळण्याअगोदर दोन भामट्यांनी लादे जवळ असलेली तीन लाख रूपयाची पिशवी लंपास करून पोबारा केला. दुसर्या एका घटनेमध्ये शुक्रवार पेठेमध्ये वास्तव्यास असलेले व्यापारी रूपेश राधेशाम मालपाणी यांनी जुना रिसोड नाका परिसरात असलेल्या जनता बँकेमधून चार लाख २0 हजाराची रोकड विड्रॉल केली. ही रोकड एका पिशवीमध्ये ठेवून त्यांनी बाहेर उभ्या केलेल्या स्विफ्ट कारमधील ड्रायव्हर सिटच्या बाजूला ठेवून निघत होते. यावेळी अचानक एका युवकाने कारच्या काचा जोरात वाजवून ह्यसाहेब मागे पहा काय झालेह्ण असे म्हणताच मालपाणी यांनी मागे पाहले तर काहीच घडलेले त्यांना दिसले नाही. लगेच त्यांनी आपल्या सिटवर ठेवलेली रोख रकमेची पिशवी सुरक्षीत आहे का पाहले असता त्याठिकाणाहून पिशवी लंपास केल्याचे आढळून आले. उपरोक्त दोघांनीही चोरट्यांचा शहर व परिसरात शोध घेतला मात्र चोरटे मिळून आले नाही. वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये दिपक मंत्री व रूपेश मालपाणी यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंविचे कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल केला.व्यापार्यांना लुटण्याच्या घटनेने शहरातील व्यापार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.