राज्याच्या सातबाऱ्यावर तब्बल पन्नास वर्षानंतर बदल; सोपा-सुटसुटीत अन् सहज समजणार नवीन सातबारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 11:44 AM2020-09-04T11:44:48+5:302020-09-04T11:54:51+5:30

सातबारा म्हटल की सहजासहजी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा विषय असतो.

Fifty years after the state saatbara of the changed; Satbara is now simpler and easier to understand | राज्याच्या सातबाऱ्यावर तब्बल पन्नास वर्षानंतर बदल; सोपा-सुटसुटीत अन् सहज समजणार नवीन सातबारा

राज्याच्या सातबाऱ्यावर तब्बल पन्नास वर्षानंतर बदल; सोपा-सुटसुटीत अन् सहज समजणार नवीन सातबारा

Next
ठळक मुद्दे शासनाचा अध्यादेश प्रसिद्ध; नवीन सातबाऱ्यावर आता क्युआरकोड ही असणार महसूल यंत्रणे मार्फत हे बदल करण्यात येणार

पुणे : राज्यातील सातबाऱ्यात तब्बल पन्नास वर्षानंतर बदल करण्यात आले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत सातबाऱ्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सातबारा साधा, सहज समजेल व सुटसुटीत संगणकीय सातबाऱ्याच्या गरजा व सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत हा सातबारा असणार आहे. या संदर्भातील अध्यादेश शासनाने प्रसिद्ध केला असून, आता महसूल यंत्रणे मार्फत हे बदल करण्यात येणार आहे. 

सातबारा म्हटल की सहजासहजी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा विषय असतो. शासकीय भाषेत असलेल्या सातबा-या वरील नोंदी व त्यातील अडचणी हा मोठा गंभीर विषय असतो. यामुळेच आता महसूल विभागाने ब्रिटीश कालीन सातबाऱ्यामध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव जमाबंदी विभागाच्या वतीने शासनाला पाठविण्यात आला. याबाबत ई- फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, या नवीन सातबाऱ्यामध्ये विविध प्रकारचे 11 बदल सुचविण्यात आले आहे. यात सातबाऱ्यावर प्रथमच महाराष्ट्र शासनाचा लॉगो, गावाचा बार कोड असे बदल करण्यात आले आहेत. याशिवाय नवीन सातबाऱ्यावर खार क्युआरकोड देण्यात आला असून, यामुळे सातबारा सहज स्कॅन देखील करता येणार आहे. 
----
नवीन सातबाऱ्यात असे आहेत बदल 

- गाव नमुना नं.७ मध्ये गावाचे नावासोबत LGD (Local Governmnt Directory) कोड दर्शविण्यात येईल.
- गाव नमुना नं.७ मध्ये अ) लागवडीयोग्य क्षेत्र व ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (अ+ब) दर्शविण्यात येईल.
- नमुना ७ मध्ये नमूद क्षेत्राचे एकक काय आहे? हे समजण्यासाठी क्षेत्राचे एकक हा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात येत आहे. यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक वापरले जाईल. 
- नमुना ७ मध्ये खाते क्रमांक या पूर्वी इतर हक्क रकान्यासोबत नमूद केला जात असे तो आता खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाईल.
- नमुना ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतरहक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या, आत्ता ती कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषामारून खोडून (strike through) दर्शविण्यात येतील.
- कोणत्याही नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येतील. संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येईल.
- कोणत्याही नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतरहक्क रकान्याचे खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या नवीन रकाना समाविष्ट करून दर्शविण्यात येईल. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून एखद्या स.नं / गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही. 
- नमुना ७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक नमुना ७ वर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात येतील. 
- शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात येतील. बिनशेती च्या ७/१२ मध्ये पोट खराब क्षेत्र , जुडी व विशेष आकारणी , तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येतील.
-  नमुना ७ मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेड लाईन छापण्यात येईल त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल. 

-  बिनशेती क्षेत्राचे नमुना ७ साठी नमुना १२ ठेवणे आवश्यक नसल्याने बिनशेती क्षेत्रासाठी नमुना १२ छापला जाणार नाही. व त्यावर सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न.१२ ची आवश्यकता नाही अशी सूचना छापण्यात येईल.

Web Title: Fifty years after the state saatbara of the changed; Satbara is now simpler and easier to understand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.