संकटाचा धाडसाने सामना करा
By admin | Published: June 10, 2014 01:17 AM2014-06-10T01:17:20+5:302014-06-10T01:17:20+5:30
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे हजारो स्वयंसेवक तयार होणे, हेच ‘आव्हान’चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंनी या शिबिरात सहभागी होऊन आकस्मिक संकटाचा धाडसाने
ज. स. सहारिया यांचे आवाहन : ‘आव्हान-२0१४’ चे उद्घाटन
नागपूर : आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे हजारो स्वयंसेवक तयार होणे, हेच ‘आव्हान’चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंनी या शिबिरात सहभागी होऊन आकस्मिक संकटाचा धाडसाने सामना करण्याचे कौशल्य प्राप्त करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव ज. स. सहारिया यांनी केले.
चान्सलर्स ब्रिगेडच्यावतीने ‘आव्हान-२0१४’ या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सहारिया बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून विभागीय आयुक्त व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू अनुप कुमार, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे, एनडीआरएफचे उपसमादेशक भैरवनाथन, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी पूरण मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक अतुल साळुंके, नागपूर विद्यापीठाचे समन्वयक डॉ. भाऊ दायदार व विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. धनंजय वेळूकर उपस्थित होते. या शिबिरात राज्यभरातील २0 विद्यापीठांमधील सुमारे ११२५ विद्यार्थ्यांंनी भाग घेतला आहे.
यावेळी सहारिया यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांंना आव्हानांचा सामना करण्याची शपथ दिली. विभागीय आयुक्त व नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू अनुप कुमार यांनी विद्यार्थ्यांंंना मार्गदर्शन करताना, सध्या नागपुरात तापत असलेले ऊनसुद्धा एक नैसर्गिक आव्हान समजून विद्यार्थ्यांंनी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)