हातकणंगलेबाहेर निवडणूक लढवून दाखवा, सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 02:49 PM2017-08-18T14:49:12+5:302017-08-18T14:54:41+5:30
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना खुलं आव्हान दिलं आहे
सांगली, दि. 18- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना खुलं आव्हान दिलं आहे. हातकणंगले मतदारसंघाबाहेर निवडणूक लढवून दाखवा, म्हणजे तुम्हाला तुमची ताकद समजेल, असं खुलं आव्हान राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिलं आहे. सदाभाऊ खोत यांनी सांगलीत बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
आणखी वाचा
सदाभाऊ खोत यांच्या नव्या संघटनेचा नारळ आष्ट्यात फुटणार
सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी
राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांची 7 ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केली होती. सदाभाऊंविरोधातील तक्रारींबाबत स्वाभिमानीने पक्षांतर्गत नेमलेल्या चार सदस्यीय समितीने, पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हकालपट्टीची घोषणा केली होती. राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा नव्हती तर फक्त क्लेश यात्रा होती, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी
सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी सदस्य समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी तशी घोषणा आहे. पत्रकार परिषदेत सावंत यांनी ही माहिती दिली. ''आजवर सदाभाऊ खोत यांनी केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर काही दिवसांत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील होणा-या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे'', असं दशरथ सावंत म्हणाले. तसेच ''सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून मंत्रिपदावर आहेत. त्यांचे पद काढून घेण्यात यावे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती यावेळी सांगण्यात आली.
सदाभाऊ खोत यांच्या नव्या संघटनेचा नारळ आष्ट्यात फुटणार?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली असून, तिला ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यावर चर्चा सुरू आहे. आष्टा (ता. वाळवा) येथे दहीहंडी अथवा विजयादशमीच्या मुहूर्तावर या संघटनेचा नारळ फुटणार असल्याचे वृत्त होतं. संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत द्विधावस्थेत आहेत. आजही त्यांच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला दिसतो. ते आता नव्या संघटनेच्या स्थापनेच्या तयारीला लागले आहेत.