शिवसेना- रवी राणांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; दिवाळीदिवशीच वृद्धाश्रमात हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 14:45 IST2019-10-27T14:24:20+5:302019-10-27T14:45:19+5:30
बडनेराजवळच्या मधुबन वृद्धाश्रमातील ही घटना आहे.

शिवसेना- रवी राणांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; दिवाळीदिवशीच वृद्धाश्रमात हाणामारी
अमरावती : अमरावतीमध्ये शिवससैनिक आणि रवी राणांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. राणा आणि सेनेचे नगरसेवक दिनेश बुब यांच्यात वादावादी झाली. या वादाची परिणिती हाणामारीमध्ये झाली.
बडनेराजवळच्या मधुबन वृद्धाश्रमातील ही घटना आहे. शिवसनेचा दिवाळीनिमित्त एक कार्यक्रम सुरु होता. यावेळी तेथे राणा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पोहोचले. यावेळी बुब आणि राणा यांच्यामध्ये निवडणुकीवरून बाचाबाची झाली.
पोलीस उपायुक्त सोळंकी यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली. यानंतर त्यांनी असा हाणामारीचा प्रकार झाला नसल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही नेते एकमेकांशी बोलल्याचे ते म्हणाले.