“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:45 AM2024-10-07T06:45:18+5:302024-10-07T06:45:55+5:30

मातोश्रीवरील पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना 'मुख्यमंत्र्यांचं कारटं' असा उल्लेख केला होता.

fight with me not son cm eknath shinde replied and challenges uddhav thackeray | “हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : मुलाशी (खा. श्रीकांत शिंदे) का भिडता, बापाशी भिडा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.

रविवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी सभापती आणि युवासेना (शिंदेसेना) सचिवांनी शेकडो कार्यकर्त्यांसह 'मातोश्री'वर उद्धवसेनेत माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना 'मुख्यमंत्र्यांचं कारटं' असा उल्लेख केला होता. यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला येते, असे म्हटले जाते. ते हेच (ठाकरे) उदाहरण आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही, तर काम करून उत्तर देऊ. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ते बिथरलेले आहेत, म्हणून तोंडाला येईल ते बोलत आहेत.


 

Web Title: fight with me not son cm eknath shinde replied and challenges uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.