साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत

By admin | Published: October 1, 2014 01:42 AM2014-10-01T01:42:37+5:302014-10-01T01:42:37+5:30

पंजाबमधील घुमान येथे होणा:या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Fighting for the fourth time for the post of Sahitya Sammelan | साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत

साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत

Next
>पुणो : पंजाबमधील घुमान येथे होणा:या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चौघांपैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने चौरंगी लढत होणार आहे. 
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा सामना रंगणार आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी दरवर्षी साहित्य विश्वातून होत असते. मात्र त्यात यश येत नाही. 
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक कामत, ज्येष्ठ कादंबरीकार, बालसाहित्यिक व कथाकार भारत सासणो आणि  महानुभाव साहित्याचे अभ्यासक पुरुषोत्तम नागपुरे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 3क् सप्टेंबरला एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने यंदाची लढत चौरंगी होईल, असे साहित्य महामंडळाचे निवडणूक अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी सांगितले. 
ही माझी पहिली व शेवटची निवडणूक असल्याचे डॉ. कामत यांनी स्पष्ट केले होते. तर डॉ. मोरे यांना पा¨ठबा देत या प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे श्रीपाल सबनीस यांनी स्पष्ट करत अर्ज भरला नव्हता. 
मतदारांकडे पोस्टाने मतपत्रिका पाठविण्याची अंतिम तारीख 
9 ऑक्टोबर असून मतपत्रिका निवडणूक अधिका:यांकडे पोहचवण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर आहे.  1क् डिसेंबरला मतमोजणी होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Fighting for the fourth time for the post of Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.